Deepika padukone
Deepika padukone Google
मनोरंजन

'आईला ऐनवेळी लक्षात आलं म्हणून,नाहीतर मी...',दीपिका पदूकोण डोकावली भूतकाळात

प्रणाली मोरे

Deepika padukone: बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदूकोण(Deepika padukone) आज ज्या पदावर आहे यामागे नक्कीच तिचे कठोर परिश्रम आहे यात नो डाऊट. पण एक काळ तिनं असाही पाहिलाय की करिअरच्या चढत्या ग्राफवर असतानाही तिच्या मनात आत्महत्येचे विचार आले होते. होय, दीपिकानं डीप्रेशन या जीवघेण्या आजाराचा सामना केला आहे. अर्थात ती अशी अभिनेत्री आहे जिनं आपला हा आजार लपवून न ठेवता याविषयी लोकांसमोर जाहीरपणे सांगितलं होतं. मोठेपणासाठी नाही तर जो कुणी या आजाराशी झुंजत असेल त्याला त्यातून बाहेर येण्यास मदत व्हावी म्हणून.(Deepika Padukone says, 'I was suicidal at times'; credits mother for recognising the signs)

दीपिकानं यासंबंधित एका NGO ची देखील स्थापना केली आहे,जी मानसिक स्वास्थ्या संदर्भात उपक्रम राबवते. दीपिका ड्रीप्रेशन मधून बाहेर यायचं संपूर्ण श्रेय आपल्या आईला देते. ती म्हणाली,''केवळ त्याक्षणी माझ्या आईच्या लक्षात आलं की मी जसं वागतेय, माझ्याबाबतीत जे होतंय ती सर्व लक्षणं डीप्रेशनची आहेत. आईनंच मला चांगल्या डॉक्टरकडे नेलं आणि मी लवकर कशी बरी होईल याकडे लक्ष दिलं''.

दीपिका डिप्रेशनविषयी बोलताना पुढे म्हणाली, ''माझ्याकडे सगळं होतं. काम,पैसा,कुटुंब तरी देखील कोणत्याही कारणाशिवाय मी पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचं फिलिंग मात्र मनात यायचं. मी आतून संपत चालले होते. ते दिवस होते, जेव्हा मी दिवस-दिवसभर झोपून राहायचे,मला उठूच नये असं वाटायचं,अगदी आत्महत्येचा भावनाही मनात यायच्या''.

दीपिका पुढे म्हणाली,''मी माझ्या पालकांच्या पुढ्यात मी ठीक आहे हे दाखवण्याचा खोटा प्रयत्न करायचे,जेव्हा ते मला भेटायला यायचे. ते बंगळुरात राहतात,ते मला मध्ये-मध्ये भेटायला यायचे,किंवा आताही आले तरी मी तसंच वागते. पण तो काळ विचित्र होता. तसंही आपल्या पालकांसमोर आपण नेहमीच आपल्याबाबतीत सगळं नीट आहे असं दाखवतो''.

डीप्रेशनच्या काळात आपल्याला जगूच नये असं वाटायचं असं देखील दीपिका आपल्या मुलाखतीत म्हणाली होती. कौन बनेगा करोडपतीच्या १३ व्या सिझनमध्ये दस्तरखुद्द अमिताभ बच्चन यांच्यासमोर दीपिकानं आपल्या डीप्रेशनच्या आजाराचा खुलासा केला होता.

दीपिका तेव्हा म्हणाली होती,''लोकांना मी माझ्या त्या आजाराविषयी बोलतेय हे पाहून विचित्र वाटेल. कारण यावर बोलायला लोक मागेपुढे करतात. पण मला वाटतं माझ्यासारखे असे अनेक असतील त्या आजाराशी झुंजणारे, मला वाटतं त्यामुळे आपण आपले अनुभव शेअर करावेत, कुणास ठाऊक आपली सकारात्मकता इतर कुणाला मदत करुन जाईल. आपली बरी होण्याची जिद्द इतर कुणाला उद्याचा नवा सूर्य दाखवून जाईल. माझा हेतू शुद्ध आहे माझ्या अनुभवांचा दुसऱ्या कुणालातरी फायदा व्हावा''.

दीपिका सध्या तिच्या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. प्रभास सोबत 'प्रोजेक्ट K' मध्ये ती काम करत आहे. हृतिकसोबत 'फाइटर' सिनेमात ती दिसणार आहे. 'द इन्टर्न' च्या रीमेक मध्ये अमिताभसोबत पुन्हा ती काम करतेय. तर शाहरुखसोबतचा तिचा 'पठाण' सिनेमा पुढील वर्षात रिलीज होत आहे. रणबीर कपूरच्या 'ब्रह्मास्त्र' मध्ये तिनं कॅमिओ साकारला आहे. बातमी आहे की एका सिनेमाच्या सिक्वेलमध्ये दीपिका आणि रणबीर पुन्हा एकत्र काम करताना दिसणार आहेत. अर्थाच पडद्यावर त्यांची केमिस्ट्री पाहणं त्यांंच्या चाहत्यांसाठी पर्वणीच ठरेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

MI vs KKR Live IPL 2024 : अय्यरची 70 धावांची खेळी, मुंबईसमोर विजयासाठी 170 धावांच आव्हान

SSC-HSC Result 2024 : सीबीएसईचा दहावी-बारावीचा निकाल २० मे नंतर होणार जाहीर

West Indies T20 WC 24 Squad : विंडीजच्या संघात सगळे स्टार मात्र इन फॉर्म जादूगारच मिसिंग

SCROLL FOR NEXT