deepika padukone (source- varindar chawla) 
मनोरंजन

Video : ...अन् त्या महिलेनं दीपिकाची पर्सच खेचली

स्वाती वेमूल

सेलिब्रिटींची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतूर असतात. मात्र चाहत्यांमुळे अनेकदा सेलिब्रिटींनाही त्रास सहन करावा लागतो. अभिनेत्री दीपिका पदुकोणसोबत असंच काहीसं घडलं. मुंबईतल्या खार परिसरातील एका रेस्टॉरंटमध्ये दीपिका गुरुवारी जेवायला गेली होती. या रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना दीपिकाभोवती चाहत्यांनी गराडाच केला. या गराड्यात एका महिलेनं दीपिकाची पर्स खेचली. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

संबंधित महिला ही टिश्यू पेपर विकण्याचा प्रयत्न करत होती. दीपिकाला ते विकत घेण्याची विनंती करत असताना महिलेनं अचानक तिची पर्स खेचली. त्यानंतर चेहऱ्यावर जराही रागाचे भाव न आणता दीपिका शांतपणे हसतमुखाने गाडीमध्ये बसली. त्यावेळी अनेकांनी तिला पर्स तपासून पाहण्यासही सांगितलं. मात्र नको, राहू द्या म्हणत, दीपिका तेथून निघून गेली. 

दीपिकाच्या चित्रपटांविषयी बोलायचे झाल्यास, ती लवकरच '८३' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये ती ऑनस्क्रीनसुद्धा रणवीर सिंगच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. यासोबतच ती शकुन बत्राच्या एका चित्रपटासाठी शूटिंग करत आहे. यामध्ये सिद्धार्थ चतुर्वेदी व अनन्या पांडेसुद्धा भूमिका साकारणार आहेत. तिच्या 'छपाक' या चित्रपटाला प्रेक्षक-समीक्षकांकडून संमीश्र प्रतिसाद मिळाला होता. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Martyr Wife Success Story: १८ वर्षांपूर्वी पती गमावला; आज त्याच वर्दीत देशसेवेची जबाबदारी, वीरपत्‍नी कल्पना पवारांचा संघर्षमय अन् प्रेरणादायी प्रवास..

India Pakistan Passports : अंबरनाथमध्ये एकाच व्यक्तीकडे भारत-पाकिस्तानचे पासपोर्ट; मुंबई ATS कडूनही चौकशी सुरू

Sonam Maskar Silver Medal : मुलीच्या रायफलसाठी वडिलांनी विकली जमीन; कोल्हापूरच्या सोनम मस्करचे आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक

Marathi News Live Updates : भुसावळ शहरात कुजलेल्या अवस्थेत आढळला मानवी मृतदेह

Satara Crime: जमिनीचा वाद पेटला अन्‌ भावकीतील युवकावर दांडक्याने हल्ला; उपचार सुरू असतानाच मृत्यू

SCROLL FOR NEXT