Deepika Padukone visits Siddhivinayak temple before chhapaak release 
मनोरंजन

'छपाक'च्या प्रदर्शनापूर्वी दीपिकानं केलं हे महत्त्वाचं काम!

वृत्तसंस्था

मुंबई : सध्या सगळीकडे 'छपाक' वारं वाहतंय. दीपिका पदुकोनचा छपाक आज सगळीकडे रिलीज झाला. छपाकच्या रिलीजपूर्वी दीपिकाने एक स्पेशल गोष्ट केली. सकाळी उठून ती थेट कुठे पोहोचली वाचा...

छपाक चित्रपट रिलीज होण्यापूर्वी त्यात अनेक विघ्न आली. काही गोष्टी तर कोर्टापर्यंत पोहोचल्या. पण सर्व अडचणींवर मात करत छपाक आज सर्वत्र प्रदर्शित होतोय. दीपिकानेही छपाकच्या रिलीज दिवशी सकाळी सकाळी सिद्धीविनायकाचं दर्शन घेतलं. बाप्पाचं दर्शन घेत चित्रपटासमोर असलेली सर्व विघ्न दूर कर अशी प्रार्थना तिने यावेळी केली. 

अॅसिड हल्ला पिडीत लक्ष्मी अगरवालचा संघर्ष या चित्रपटात दाखविण्यात आला आहे. छपाकच्या दिग्दर्शकांवर संहिताचोरीचा आरोप लागला होता. तसेच यातील अॅसिड हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा धर्मही चित्रपटात बदलला गेला असल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच दोन दिवसांपूर्वीच दीपिकाने जेएनयुमध्ये जात तेथील हिंसाचाराविरोधी आंदोलनात सहभाग नोंदवला होता. यामुळे तिच्यावर बरीट टीका झाली होती. मात्र या सगळ्याला तोंड देत दीपिकाचा बहुचर्चित छपाक आज प्रदर्शित होतोय.    
   

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT