Deepika Padukone weares a weird dress at Chhapaak promotion  
मनोरंजन

अरे बापरे! दीपिका, काय घातलंयस गं हे??

वृत्तसंस्था

बॉलिवूडमधल्या अभिनेत्री नेहमी काहीतरी वेगळी वेशभूषा परिधान करण्याच्या प्रयत्नात असतात. अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या कॉस्चुम डिझायनरकडून हटके कपडे डिझाईन करत अभिनेत्री फोटोसेशन करतात. कोणताही पुरस्कार सोहळा असो किंवा एखादा कार्यक्रम असो बॉलिवूडमधल्या तारकांच्या वेशभूषेकडे सर्वांचे लक्ष असते. पण बऱ्याचदा त्या या वेगळ्या वेशभूषेमुळे ट्रोल होताना दिसतात. अशाच प्रकारे हटके ड्रेस घालून दीपिका पदुकोन ट्रोलर्सची लक्ष्य बनली आहे. दीपिकाने असा ड्रेस घातलाय की नेटकरी म्हणू लागलेत, काय गं बाई हे काय घातलंस??

सध्या दीपिका तिच्या 'छपाक' या नव्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. याच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ती एका इव्हेंटला गेली असता तिच्या ड्रेसने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तिचा ड्रेस इतका विचित्र होता की, सोशल मीडियावर तिला यामुळे लगेचच ट्रोल करण्यात आले. काहींनी तर तिला 'लेडी रणवीस सिंग' अशी उपमा दिलीय.

या प्रमोशन दरम्यान दीपिका पांढऱ्या रंगाच्या शर्टमध्ये दिसली. तो प्रचंड ढगळा होता. त्या खाली निळ्या रंगाची लूज जीन्स तिने घातली आहे. पण सगळ्यात विचित्र म्हणजे या शर्टवर दीपिकाने काळ्या रंगाचा कोरसेट घातला आहे. शर्टवर कोरसेट घातल्याने ते थोडं विचित्र दिसतंय आणि याचमुळे ती सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होतीय. ती नेहमी डिझायनर सब्यसाचीचे कपडे घालते, त्यात ती सुंदर दिसते पण आता हा प्रकार केल्याने तिची खिल्ली उडवली जात आहे.

दीपिकाचा नवरा रणवीर हाही त्याच्या विचित्र कपड्यामुंळे ट्रोल होत असतो. पण आता दीपिकाही असे ड्रेस घालू लागल्याने हे 'शादी के साईड इफेक्ट्स' तर नाहीत ना, असा सवाल नेटकरी करू लागले आहेत. तर एका युजरने तिची तुलना चक्क सुपरमॅनशी केली आहे जो पँटवरून अँडरवेअर घालतो. तर काही जण म्हणतायत हे असे कपडे दीपिकाच घालू शकते. 

अॅसिड हल्ला पीडित लक्ष्मी अगरवालच्या जीवनावर आधारित छपाक हा चित्रपट 10 जानेवारीला रिलीज होईल. त्यात दीपिका मुख्य भूमिका साकारत आहे. सध्या याच चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये ती बिझी आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs ENG, T20 WC: हॅरी ब्रूकचे विश्वविक्रमी शतक, इंग्लंड उपांत्य फेरीत! पाकिस्तान वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर? पाकड्यांची रडारड...

Kirit Somaiya Amravati Meeting Controversy : आयुक्तांचा बचाव करणारे महापौर सापडले अडचणीत; किरीट सोमय्यांची अमरावतीची बैठक ठरतेय वादग्रस्त?

Ajit Pawar Plane Crash: 'व्हीएसआर'च्या विमान उड्डाणांवर बंदी; बारामती विमान अपघात प्रकरणी DGCAची मोठी कारवाई

Pune Crime : बारावीचा पेपर संपताच कोथरूडमध्ये विद्यार्थ्यावर कोयत्याने वार; दोन अल्पवयीन ताब्यात

Fruit Drink Maaza: 'माझा'च्या छोटा पॅकमध्ये आढळली घाण; ११ वर्षीय मुलाची प्रकृती बिघडली

SCROLL FOR NEXT