Dhak Dhak trailer: Esakal
मनोरंजन

Dhak Dhak trailer: "अरे ये आंटी..." चार बायकांची 'बाइक ट्रिप'! 'धक धक'चा भन्नाट ट्रेलर एकदा पाहाच...

Vaishali Patil

Dhak Dhak trailer: गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये अनेक नवनव्या चित्रपटाची रेलचेल आहे. सध्या तीन सिनेमांची बॉक्स ऑफिसवर टक्कर आहे. ज्यात मीशन रजणीगंज, फुकरे आणि थँक यू फॉर कमिंग हे सिनेमे आहेत.

तर 'टायगर', 'गणपत', डंकी आणि सालार सारख्या बऱ्याच चित्रपटांची प्रेक्षकांना प्रतिक्षा आहे. आता त्यातच गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या फातिमा सना शेखच्या आगामी 'धक धक' सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

बऱ्याच दिवसांपासून या सिनेमाची चर्चा होतीच. आता 'धक धक' सिनेमाचा भन्नाट ट्रेलर रिलिज करण्यात आला आहे. एक हटके हलकी फुलकी कहानी या चित्रपटात प्रेक्षकांना दिसणार आहे.

फातिमा सना शेख सोबतच रत्ना पाठक शाह, दिया मिर्झा आणि संजना संघी यांसारख्या दमदार अभिनय करणाऱ्या अभिनेत्री या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाची कथा 4 सामान्य महिलांवर आधारित आहे.

या महिला आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी एकत्रितपणे प्रवासाला निघतात. त्याच्या या प्रवासाची सुरुवात आणि या प्रवासात त्यांना येणारे अडधळे बरच काही शिकवणार आहे. कॉमेडीच्या माध्यमातून एक जोरदार संदेश 'धक धक' या सिनेमातुन देण्यात येतो.

यात चारही अभिनेत्री मस्त बाईक राईड करतांना दिसत आहे. तर रत्ना पाठक यांच्या अभिनय आणि संवादानंतर हा चित्रपट मनोरंजनाची एक खास मेजवाणी ठरणार आहे यात काही शंका नसल्याचे दिसत आहे.

'धक धक'चा ट्रेलर शेअर करताना फातिमा खानने लिहिले की, 'कधीकधी, तुम्हाला तुमची स्वप्ने जगण्याची संधी घ्यावी लागते.' आता फातिमाचे चाहते या चित्रपटासाठी खुप उत्सूक दिसत आहे. तर दिया मिर्झा आणि संजना संघी यांना पाहण्यासाठी देखील प्रेक्षक आतुर झाले आहेत.

'धक धक' हा चित्रपट 13 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. तरुण दुडेजा हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. तर पारिजात जोशी यांनी हा कथा लिहिली आहे. Taapsee Pannu's Outsiders Films आणि Viacom 18 Studios ने BLM Pictures ने 'धक धक' ची निर्मिती केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

WhatsApp चं Username फीचर वादाच्या भोवऱ्यात, केंद्र सरकारने थेट Meta ला पाठवली नोटीस, तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

Raigad Accident: पालीत मोठा अनर्थ टळला! खड्ड्यांमुळे एसटी बस रस्त्याखाली घसरली; चालकाच्या प्रसंगावधानाने ४२ प्रवाशांचे प्राण वाचले

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

SCROLL FOR NEXT