Dharmendra Reacted On Bobby Deol Shirtless Body: 
मनोरंजन

Dharmendra Reacted On Bobby Deol: 'अ‍ॅनिमल'मधल्या लेकाच्या शर्टलेस लूकवर धर्मेंद्र फिदा! व्हिडिओ शेयर करत म्हणाले,..

Vaishali Patil

Dharmendra Reacted On Bobby Deol: बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल सध्या खूप चर्चेत आहे. गेल्या काही दशकांपासून तो इंडस्ट्रीवर राज्य करत आहे. रेस 3 मधून बॉबीने धमाकेदार पुनरागमन केले आहे. चित्रपटांव्यतिरिक्त, OTT वर देखील बॉबी देओलची जादू चालू आहे. सध्या बॉबी चर्चेत आहे तो त्याच्या अ‍ॅनिमल चित्रपटातील लूकमुळे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टिझर रिलिज करण्यात आला.

या टिझरमध्ये रणबीर, रश्मिका आणि अनिल यांच्यापेक्षा जास्त लाईमलाईट मिळवली ती बॉबीच्या शेवटच्या सीनने. बॉबीच्या अगदी काही सेंकदाच्या सीनने रणबीरलाही फिके पाडले आहे. या चित्रपटात बॉबी देओल नकारात्मक भूमिका साकारत आहे ज्यासाठी त्याने खूप मेहनत घेतली आहे.

बॉबीने त्याच्या लूक, एक्सप्रेशन आणि बॉडीवर खूप मेहनत घेतली आहे, जी स्पष्टपणे दिसते. बॉबी देओल शर्टलेस लूकमध्ये त्याची बॉडी आणि अ‍ॅब्स फ्लाँट करताना दिसत आहे.

बॉबीच्या लूकला पाहून केवळ त्याचे चाहतेच नाही तर मनोरंजन विश्वातील कलाकारही त्याचे कौतुक करत आहे.

2 ऑक्टोबरला धर्मेंद्र यांनी सोशल मीडियावर अ‍ॅनिमलच्या टीझरमधून बॉबी देओलची झलक शेअर केली आहे. यात टीझरच्या शेवटी, तो शर्टलेस दिसत आहे. या व्हिडिओसोबत धर्मेंद्र यांनी लिहिले की, 'माझा निरागस मुलगा अ‍ॅनिमल’मध्ये'

तर या व्हिडिओवर ते लिहितात की, 'तुम्ही सर्व ऐका, 1 डिसेंबरला थिएटरमध्ये यायचं नाहीतर...'

सध्या धर्मेंद्र यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खुप चर्चेत आला आहे. नेटकरी त्याच्या या व्हिडिओवर भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. ' बॉबी पाजी इतके पण निरगस नाहीत' अशी प्रतिक्रिया एकाने दिली. तर एकाने लिहिलयं, 'जर तो निरागस असेल तर मी देवदूत आहे.' तर एकानं आता 'देओल युग' सुरु झालेलं आहे. असं म्हटलं आहे.

रणबीर कपूर स्टारर 'अ‍ॅनिमल' चित्रपटात रश्मिका मंदान्ना, बॉबी देओल आणि अनिल कपूर देखील दिसणार आहेत. हा चित्रपट 1 डिसेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पहात आहे. बॉबीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर तो शेवटचा वेब सीरिज 'आश्रम 3' मध्ये दिसला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

निवडणूक आयोगाविरोधात इंडिया आघाडी आक्रमक, राहुल गांधींसह ११ नेत्यांनी दाखल केली याचिका, सुनावणी कधी?

Laptop Mobile Cleaning Tips: मोबाईल बाथरूमपासून बेडरूमपर्यंत कुठेही नेता? मग जंतूंचा संपर्क कमी करण्यासाठी स्वच्छतेच्या 'या' टिप्स वापराच

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे अजूनही सर्वोच्च न्यायालयात, इंडिया आघाडीचे नेतेही उपस्थित

रेल्वे प्रवासात प्रवाशांची घुसमट, अपुऱ्या सुविधांमुळे दररोज गर्दीशी सामना; अतिरिक्त लोकलची मागणी

मायकल जॅक्सनला टिळा लावून स्वागत करणारी एकमेव अभिनेत्री; कसा होता तो अनुभव? सोनाली बेंद्रे म्हणाली- मी कधीच.

SCROLL FOR NEXT