Dharmendra was about to give up on his dream of becoming an actor during his struggling days sakal
मनोरंजन

Dharmendra Birthday: गाडी सुटणार तितक्यात मनोज कुमार आले आणि धर्मेंद्र यांचं नशीब पालटलं..

एकेकाळी चित्रपटसृष्टीत काम मिळवण्यासाठी झगडणारे धर्मेंद्र आज एक दिग्गज अभिनेते आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Dharmendra Birthday Special: बॉलीवुडमधील दिग्गज नट म्हणजे अभिनेते धर्मेंद्र यांचा वाढदिवस. त्यांचे कित्येक चित्रपट आजही आपल्या लक्षात आहेत. 'शोले' तर कायमस्वरूपी सगळ्यांच्या मनावर कोरला गेला आहे. एकेकाळी 'अॅक्शन हीरो' म्हणून प्रसिद्ध असलेले धर्मेंद्र आज वृद्धापकाळातही अत्यंत आनंदात आणि उत्साहात जगत आहेत. आज त्यांचा वाढदिवस असून ते 88 व्या वर्षात पदार्पण करत आहे. आज त्यांनी एवढं यश मिळवलेलं असलं तरी एक काळ असा होता की, काम मिळत नसल्याने धर्मेंद्र मुंबईतील गाशा गुंडाळून गावी निघाले होते. आज जाणून घेऊया नेमकं काय झालं होतं तेव्हा.. (Dharmendra was about to give up on his dream of becoming an actor during his struggling days)

'धर्मेंद्र' यांचे पूर्ण नाव धरम सिंह देओल (Dharam Singh Deol) असे आहे. पण ते 'धर्मेंद्र' याच नावाने परिचित आहेत. बॉलीवुडमध्ये धर्मेंद्र 'अॅक्शन हीरो' म्हणून ओळखले जात असतानाच अनेक रोमॅंटिक सिनेमे त्यांच्या वाट्याला आले त्यांनी आपल्या दमदार अभिनयाने ते हिट देखील केले. त्यांच्या उमेदीच्या काळात त्यांच्यापुढे चित्रपटांचा अक्षरशः ढीग लागायचा, पण त्यांच्या करियरची सुरुवात अत्यंत कठीण परिस्थितीत झाली आहे.

धर्मेंद्र पंजाबमधून आल्यानंतर मुंबईत नशीब आजमावत होते, तेव्हा त्यांची भेट मनोज कुमार यांच्याशी झाली. दोघेही एकाच मार्गावर होते त्यामुळे मैत्रीही झाली. मनोज कुमार यांना लेखनाची कामे मिळत असल्याने त्यांचे उत्तम चालले होते पण धर्मेंद्र यांना मात्र कोणतेच काम मिळत नव्हते. ज्या चित्रपटासाठी ते पंजाबहून मुंबईला आहे तो हे पूर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे धर्मेंद्र प्रचंड तणावात होते.

धर्मेंद्र यांना सिनेसृष्टीत यश मिळत नसल्याने त्यांनी मुंबई सोडून पुन्हा पंजाबला आपल्या गावी जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी ट्रेनदेखील पकडली होती. पण धर्मेंद्र परत जात असल्याचे मनोज कुमार यांना समजले आणि त्यांनी लगेचच स्टेशन गाठलं. धर्मेंद्र यांना भेटून समजावलं आणि घरी परत आणलं. तोच धर्मेंद्र यांच्या आयुष्यातील मोठा दिवस ठरला.

धर्मेंद्र यांनी 1960 साली अर्जुन हिंगोरानीच्या 'दिल भी तेरा हम भी तेरे' या सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. या सिनेमासाठी त्यांना 51 रुपये मानधन मिळालं होतं. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. आजवर त्यांनी एकापेक्षा एक हिट सिनेमे करत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Cricket in Trouble: पाकिस्तानला 'नाटक' महागात पडणार, ICC ने पाठवला ई मेल! PCB ने स्पर्धेचे अनेक नियम मोडले, आता...

Asia Cup 2025 Super 4 Schedule: भारतीय संघ कोणत्या तारखांना कोणाला भिडणार? जाणून घ्या सुपर ४ चं संपूर्ण वेळापत्रक

AFG vs SL Live: लक्ष्य १७० धावांचे, पण १०१ धावा करताच श्रीलंका पोहोचली Super 4 मध्ये; अफगाणिस्तानला लटकवले, कसे ते घ्या जाणून...

Adani Group News : अदानी समूहाला मोठा दिलासा; 'SEBI'ने 'हिंडेनबर्ग'चे आरोप फेटाळले!

Khadakwasla Dam : खडकवासला धरणातून ३१ तासांनी १२६३ क्युसेक विसर्ग सुरू

SCROLL FOR NEXT