Dia Mirza esakal
मनोरंजन

Dia Mirza : दिया मिर्झाने गमवली जवळची व्यक्ती, भावूक होत शेअर केली पोस्ट

अभिनेत्री दिया मिर्झाने जवळची व्यक्ती गमवली आहे.

सकाळ डिजिटल टीम

बाॅलीवूड अभिनेत्री दिया मिर्झाची भाचीचे निधन झाले आहे. ही दुःखद बातमी स्वतः अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत दिली आहे. तिने इन्स्टा अकाऊंटवर आपल्या भाचीला श्रद्धांजली वाहिली आहे. दियाने एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. ती वाचून चाहत्यांबरोबर बाॅलीवूड कलाकारही भावूक झाले आहेत. अनेकांनीही श्रद्धांजली वाहिली आहे. दिया मिर्झाने (Dia Mirza) आपल्या भाचीचा फोटो शेअर करत लिहिले आहे, की माझी भाची, माझं बाळ. माझा जीव की प्राण आता या जगात राहिली नाही. तू जेथे कुठे राहशील, नेहमी माझ्यासाठी खास राहशील. तुला शांती आणि प्रेम मिळो. तू नेहमी आमच्या हृदयात राहशील! ओम शांती ! (dia mirza niece tanya passes away she write an emotional post)

दिया मिर्झाच्या या पोस्टवर बाॅलीवूड (Bollywood News) कलाकारांनीही शोक व्यक्त केला आहे. अर्जुन रामपाल, गौहर खान, फराह खान अली, रिद्धीमा कपूर यासारख्या सिनेतारकांनी दियाच्या पोस्टवर प्रतिक्रिया देत तिच्या भाचीला श्रद्धांजली अर्पण केली आहे. अर्जुन रामपाल म्हणाला - ऐकून खूपच वाईट वाटले दिया. तुम्हा सर्वांसाठी प्रार्थना. ओम शांती !

वेगवेगळ्या वृत्तांनुसार दिया मिर्झाच्या भाचीचे नाव तान्या होते आणि तिचा मृत्यू कार अपघातामुळे झाला आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाहून आपल्या चार मित्रांबरोबर परतत असताना ती दुर्घटनेची शिकार ठरली. तिला तात्काळ दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र तिचा जीव वाचवण्यात यश आले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT