Did you know Alia Bhatt's one of the relative who is from bollywood, advised Katrina Kaif to dump her then-boyfriend Ranbir Kapoor?| Google
मनोरंजन

रणबीर-कतरिना ब्रेकअपला जबाबदार होती आलियाच्या नात्यातली व्यक्ती,नाव ऐकाल तर

आलिया भट्टला डेट करण्याच्या अगोदर रणबीर कतरिना सोबत काही वर्ष रीलेशनशीपमध्ये होता.

प्रणाली मोरे

रणबीर कपूर(Ranbir Kapoor) आणि आलिया भट्टनं(Alia Bhatt) १४ एप्रिल २०२२ रोजी लग्नगाठ बांधली आहे. आता त्यांच्याशी संबंधित एक चटपटीत बातमी पुन्हा कानावर पडतेय. आता हे आपल्या सर्वांनाच माहितीय की आलियाच्या आधी काही वर्ष रणबीर कतरिना कैफ(Katrina Kaif) ला डेट करीत होता. दोघे काही वर्ष लीव्हइन मध्ये देखील राहत होते. याच दरम्यान कतरिना कैफला आलिया भट्टच्या चुलत भावानं म्हणजेच अभिनेता इमरान हाश्मीनं(Emraan Hashmi) एक सल्ला दिला होता. त्यानं कतरिनाला रणबीरला सोडून देण्याचा सल्ला दिला होता. हो आज अनेक वर्षांनी या गोष्टीचा उलगडा झाला आहे.

इम्रान हाश्मीनं करण जोहरच्या सेलिब्रिटी चॅट शो मध्ये याविषयी सांगितले होते. करण जोहरने त्याला तेव्हा विचारलं होतं की,''तो रणबीर-कतरिनाला काय सल्ला देईल?'' त्यावंर इमराननं रणबीर कपूरला सल्ला दिला होता की,''तो मुलींशी खेळणं बंद करे'', आणि कतरिनाला सल्ला दिला होता की, ''तिनं रणबीर कपूरला सोडून द्यायला हवं.

रणबीर कपूर आणि कतरिना कैफचं ब्रेकअप हे त्यांच्या 'जग्गा जासूस' सिनेमानंतर झालं होतं. हा सिनेमा बॉक्सऑफिसवर फ्लॉप झाला होता. ब्रेकअप झालं असलं तरी दोघांनी कधीही एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले नाहीत ना सार्वजनिक ठिकाणी एकमेकांविरोधात बोलणं पसंत केलं. इमरान हाश्मी लवकरच कतरिना कैफसोबत 'टायगर ३' सिनेमात दिसणार आहे. रणबीर-आलियाच्या लग्नात मात्र इमरानची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली.

आता रणबीर-आलियाचं लग्न झालं आहे त्यामुळे जुन्या गोष्टी उकरुन काढण्यात काहीच अर्थ नाही. पण इमरान हाश्मिचं नाव रणबीर-कतरिनाच्या ब्रेकअपशी जोडलं गेल्यानं उगाचच चर्चा होतेय. असो,आता लग्नानंतर आलिया-रणबीरचा 'ब्रह्मास्त्र' हा सिनेमा प्रदर्शित होतोय,ज्या माध्यमातून ते एकत्र प्रथमच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. या सिनेमात मौनी रॉय देखील महत्त्वाची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. तर आलिया सध्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' सिनेमाच्या शूटिंगमध्ये आणि कतरिना तिच्या 'मेरी ख्रिसमस'च्या शूटिंग मध्ये बिझी आहे,

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Closing: सेन्सेक्स 270 अंकांनी वाढला; शेवटच्या तासात बाजाराने घेतला यू-टर्न, काय आहे कारण?

'चला हवा येऊ द्या २' मध्ये भाऊ कदम का नाही? प्रेक्षक नाराज; अखेर खरं कारण समोर

Pakistani Boat Raigad : रायगडच्या समुद्रात पाकिस्तानी संशयित बोट, गुप्तचर विभागाला मॅसेज; जिल्हाधिकाऱ्यांनी बोलवली बैठक

Shocking News: नवरदेव आणि वऱ्हाडींना मंडपातच बेदम चोपले, हॉस्पिटलमध्येच लावाले लागले लग्न, तिथूनच नवरीची पाठवणी; नेमकं काय घडलं?

IND vs ENG 3rd Test: लॉर्ड्स जिंकायची तयारी...! टीम इंडियाची जबरदस्त रणनीती; जसप्रीत बुमराह आला आहेच, शिवाय...

SCROLL FOR NEXT