dil bechara title track 
मनोरंजन

सुशांत सिंह राजपूतचं 'दिल बेचारा' टायटल ट्रॅक रिलीज, शेवटचं गाणं पाहून चाहते झाले भावूक

दिपालीराणे-म्हात्रे, प्रतिनिधी

मुंबई- सुशांत सिंह राजपूतच्या दिल बेचारा सिनेमाचं टायटल ट्रॅक रिलीज झालं आहे. या गाण्याला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळतेय. काही दिवसांपूर्वीच या गाण्याचा टिझर आला होता ज्याला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला होता. हे गाणं सुशांतच्या आयुष्यातलं आणि मोठ्या पडद्यावरचं शेवटचं गाणं आहे त्यामुळे हे गाणं पाहताना प्रेक्षक भावूक झाले आहेत. 

'दिल बेचारा' सिनेमाचं हे टायटल साँग आहे. या गाण्याला फराह खानने कोरिओग्राफ केलं आहे. सोशल मिडियावर सुशांतच्या या गाण्याची आणि त्याच्या नृत्य कौशल्याची स्तुती करत आहेत. सुशांत आणि संजना सांघीवर आधारित या गाण्याची खासियत म्हणजे हे गाणं एका टेकमध्ये शूट केलं गेलं आहे. तर फराहने देखील या गाण्याची कोरिग्राफी करण्यासाठी फी आकारली नाहीये.

हे गाणं रिलीज होताच ए.आर.रेहमान, संजना सांघी सोबत अनेक सेलिब्रिटींनी ट्विट केलं आहे. ट्विटरवर तर या गाण्याला मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया मिळत आहेत. हे गाणं पाहून सुशांतच्या डान्संच कौतुक होतंय. तर त्याच्या हास्यावर अनेकजण फिदा होत आहेत. या सिनेमाची सगळी गाणी ए.आर. रेहमान यांनी संगीतबद्ध केली आहेत.

'दिल बेचारा फ्रेंडझोन का मारा' असे या गाण्याचे बोल आहेत. या गाण्याच्या माध्यमातून सुशांत सिनेमातील पात्राच्या मनातील दुःख सांगताना दिसतोय. या गाण्याला युट्युबवर रिलीज होताच ५ तासांत ६ कोटींपेक्षा जास्त व्ह्युज मिळाले आहेत. 'दिल बेचारा' ट्रेलरप्रमाणेच हे टायटल साँगही कित्येक गाण्यांचे रेकॉर्ड ब्रेक करेल असंच दिसतंय. 

सुशांतचे चाहते हे गाणं पाहून भावूक झाले आहेत. 'दिल बेचारा' हा सिनेमा हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर २४ जुलै रोजी रिलीज होणार आहे. या सिनेमाची देखील चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. 

dil bechara title track twitter reaction fans missing sushant singh rajput  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad-Nagar Panchayat Election Result 2025 LIVE : मराठवाड्यात किती नगराध्यक्ष, किती नगरसेवक निवडून येणार? एका क्लिकवर वाचा

Lionel Messi India Visit : लिओनेल मेस्सीच्या भारत दौऱ्याने फुटबॉलप्रेमींना दिली प्रेरणादायी ऊर्जा

Suryakumar Yadav Cricket Stats : हे ‘सूर्यग्रहण’ सुटायला हवे!

साप्ताहिक राशिभविष्य : २१ डिसेंबर २०२५ ते २७ डिसेंबर २०२५

Morning Breakfast Recipe: Fit राहायचंय? मग सकाळी नाश्त्यात बनवा ज्वारीच्या पीठापासून मस्त नाश्ता, सोपी आहे रेसिपी

SCROLL FOR NEXT