Dipti Dhyani shaves off her head for husband Sooraj Thapar Instagram
मनोरंजन

प्रसिद्ध टी.व्ही अभिनेत्याच्या पत्नीनं केलं टक्कल; कारण ऐकून व्हाल थक्क

अभिनेता सूरज थापर यानं यासंदर्भातला पत्नीचा तो व्हिडीओ शेअर केला अन् सोशल मीडियावर तो जोरदार व्हायरल झाला.

प्रणाली मोरे

छोट्या पडद्यावरचा(TV) प्रसिद्ध अभिनेता(Famous Actor) सूरज थापर(Sooraj Thapar) याची पत्नी दिप्ती ध्यानीनं( Dipti Dhyani) प्रेमात माणूस काय करू शकतो हे दाखवणारं उदाहरण सर्वांसमोर ठेवलं आहे. दिप्ती ध्यानीनं आपल्या पतीसाठी आपले केस तिरुपति बालाजीला दान केले आहेत. यानंतर दिप्तीचा एक व्हिडीओ सूरजनं सोशल मीडियावर शेअर केला आहे. दिप्तीच्या या त्यागाचं अनेक सेलिब्रेटींपासून सर्वसामान्यांपर्यंत साऱ्यांनीच खूप कौतूक केलंआहे.

गेल्यावर्षी मे महिन्यात सूरज थापर यांना कोरोना झाला होता. सूरज त्यावेळी इतके अत्यावस्थ होते की त्यांच्या फुप्फुसाला जवळ-जवळ 70 टक्के संसर्ग झाला होता. खूप नाजूक अवस्थेत असलेल्या सूरज यांना त्यावेळी आयसीयू मध्ये दाखल करण्यात आले होते. तेव्हा सूरजची प्रकृती सुधारावी यासाठी त्यांची पत्नी दिप्तीनं देवाला साकडं घातलं होतं की जर तिचे पती पूर्ण बरे झाले तर ती आपले केस तिरुपति बालाजीला दान करेल. आता दिप्तीनं सूरज पूर्ण बरा झाल्यानंतर आपले केस दान करून पूर्ण टक्कल केलं आहे. हा व्हिडीओ आम्ही इथे बातमीत जोडलेला आहे.

सूरज थापरनं हा व्हिडीओ शेअर करताना लिहिलं आहे,''ट्रान्सफॉर्मेशन...हे खरं प्रेम आहे. या जगात कोणीच हे तुमच्यासाठी नाही करु शकत. हे एकदम शुद्ध प्रेम आहे''. सूरजनं शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. आणि टी.व्ही इंडस्ट्रीतील लोक दिप्तीची मनापासून प्रशंसा करताना देखील दिसत आहेत.

सूरज थापर संदर्भात बोलायचं झालं तर 'चंद्रगुप्त मौर्य','रजिया सुल्तान','एक नई पहचान','ससुराल गेंदा फूल','भाईभैय्या और ब्रदर','अकबर का बल बिरबल','तेनाली राम' सारख्या अनेक प्रसिद्ध मालिकांमधून त्यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: Virat Kohli त्याचे सामनावीर ट्रॉफी कुठे ठेवतो? न्यूझीलंडविरुद्ध पुरस्कार जिंकल्यानंतर सांगून टाकलं

WPL 2026, DC vs GG: १ बॉल अन् ५ धावा... गुजरात जायंट्सने मिळवला थरारक विजय, जेमिमाच्या दिल्लीचा सलग दुसरा पराभव

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

SCROLL FOR NEXT