director Anil Ravipudi will be directing Nagarjuna and Akhil Akkineni upcoming multi starrer.jpg 
मनोरंजन

'बाप-लेक झळकणार एकाच चित्रपटातून'; दिग्दर्शक अनिल रवीपुडींचा नवीन सिनेमा

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - कोरोनामुळे गेल्या महिन्यांपासून देशातील सिनेमा क्षेत्रावर दु:खाचे सावट होते. काही काळाने ती परिस्थिती सावरताना दिसत आहे. एकीकडे जरी शासनाने सिनेमागृह सुरु करण्याची परवानगी दिली असली तरी अद्याप प्रेक्षक सिनेमागृहाकडे फिरकलेले नाहीत. अशात काही दिग्दर्शकांनी जोरदारपणे आपल्या कामाला सुरुवात केली आहे. यात विशेषत; दाक्षिणात्य दिग्दर्शकांनी आघाडी घेतली आहे.

प्रसिध्द दिग्दर्शक अनिल रवीपुडी हे आता दक्षिणेतला सुपरस्टार नागार्जुनला घेऊन एक चित्रपट करत आहेत. यात आनंदाची बाब म्हणजे नागार्जुनचा मुलगा अखिल अक्कीनी यात दिसणार आहे. अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. त्याच्या या नव्या चित्रपटाची सर्वांनाच मोठी उत्सुकता आहे. प्रेक्षकांना अखिलच्या चित्रपटक्षेत्रातील पदार्पणाविषयी कुतूहल आहे. अनिल यांचा फन अँड फस्ट्रेशन चित्रपट रसिकांच्या पसंतीस पडला होता.

आता ते एफ 3 च्या वाटेवर आहेत. एफ 2 मध्ये व्यंकटेश डेबागुट्टी आणि वरुण तेज यांनी भूमिका केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून अखिलच्या नव्या चित्रपटाची चर्चा सुरु होती. अनिल यांच्या एफ 2 या चित्रपटात तमन्ना भाटिया, मेहरिन पिरझादा यांनीही भूमिका केल्या आहेत. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अनिल हे आपल्या नव्या चित्रपटाच्या चित्रिकरणाला पुढच्या वर्षी सुरुवात करणार आहेत.

नागार्जुन हे सध्या त्याच्या वाईल्ड डॉग या चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यस्त आहे. या चित्रपटाकडेही त्याच्या चाहत्यांचे लक्ष असणार आहे.अखिलच्या नव्या प्रवासाविषयी अनेकांना कुतूहल आहे. खरे तर अनिल यांनाही आपल्या या चित्रपटात एका नव्या चेह-याची गरज होती. यात मुख्य अभिनेत्री म्हणून पुजा हेगडे काम करणार आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रस्त्याच्या दर्जावरून लोकांनी प्रश्न विचारले, व्हिडीओ शूट करणाऱ्या तरुणाला मंत्र्यांने कानशिलात लगावली; VIDEO VIRAL

Ahilyanagar District Bank : अहिल्यानगर जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी गुप्त बैठक; सुजय विखेंचा थोरातांना वाकून नमस्कार चर्चेत

रिपोर्टवर ‘नॉर्मल’ लिहिलंय म्हणून खुश होऊ नका! हृदयाच्या आरोग्यासाठी कोलेस्ट्रॉलची आकडेवारी समजून घ्या!

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीत वाघाचे अवयव आणि २ खवले मांजर जप्त

Asian Games 2026 : नाशिकच्या सर्वेश कुशारेनं जिंकलं ऐतिहासिक पदक! भारताच्या खात्यात १५ मिनिटांच्या अंतरानं ४ मेडल्स

SCROLL FOR NEXT