Disha Salian Suicide Case fiance rohan rai reveals what happened before her death
Disha Salian Suicide Case fiance rohan rai reveals what happened before her death Google
मनोरंजन

Disha Salian Case: दिशाच्या आत्महत्येपूर्वीचा एक एक क्षण अंगावर काटा उभा करेल, बॉयफ्रेंड रोहन रायचा खुलासा

प्रणाली मोरे

Disha Salian Case:आपल्या सगळ्यांना दिशा सालियान नाव माहीत असणारंच,हो तिच जी दिवंगत सुशांत सिंग राजपूतची मॅनेजर होती. अभिनेत्री आणि मॉडेलही होती. दिशानं मालाड येथील आपल्या १२ व्या मजल्यावरील फ्लॅटमधून उडी मारत आत्महत्या केली होती. जून २०२० मध्ये तिच्या मृत्यूनंतर अनेक गोष्टी समोर आल्या होत्या. पण दिशाचा मृत्यू ही हत्या नसून आत्महत्याच होती हे कारण पोलिसांनी पुढे करून तिच्या केसचा तपास थांबवला होता. आता दिशाचा बॉयफ्रेंड रोहन रायनं समोर येऊन तिच्या मृत्यूनंतर आपल्या आयुष्यात काय खळबळ माजली यावर मोठा खुलासा केला.(Disha Salian Suicide Case fiance rohan rai reveals what happened before her death)

दिशा सालियान सेलिब्रिटी मॅनेजर होती तर रोहन राय मॉडेल आणि अभिनेता होता. दिशाच्या मृत्यूनंतर रोहन लाइमलाइटमध्ये आला. केसच्या तपासादरम्यान त्याच्यावर खूप लोकांनी ताशेरे ओढले. त्यानंतर रोहननं सोशल मीडियावरचं आपलं अकाऊंट बंद केलं आणि लोकांच्या नजरेच्या टप्प्यात आपण येणार नाही असा तो गायब झाला होता. पण आता दोन वर्षानंतर त्यानं आपल्या आयुष्याची एक नवीन सुरुवात केली आहे. एका इंग्रजी वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत रोहन रायने दिशाच्या अचानक झालेल्या मृत्यूवर भाष्य केलं आहे. तसंच,दिशाच्या जाण्यानंतर आपलं आयुष्य हादरल्याचं देखील तो म्हणाला.

रोहन गेली दोन वर्ष कुठे होता याविषयी कोणालाच कानोकान खबर नव्हती. याविषयी जेव्हा त्याला विचारलं गेलं तेव्हा तो म्हणाला,''जोपर्यंत पोलिसांचा तपास सुरू होता तोपर्यंत मी मुंबईतच होतो. त्यानंतर मी माझ्या पालकांसोबत डिसेंबर,२०२० मध्ये माझ्या होमटाऊनला म्हणजे गांधीधामला निघून गेलो. तीन महिन्यांनी मी तेव्हा मुबंईत परत आलो होतो. दिशाच्या मृत्यूनंतर जे काही घडलं त्यापासून मला दूर रहायचं होतं. लोक काहीही विचार न करता दिशाविषयी लिहित होते,बोलत होते. याचा परिणाम माझ्या आणि दिशाच्या कुटुंबावर झाला. याचा लोक मात्र तिळमात्र विचार करताना दिसले नाहीत''.

दिशाच्या मृत्यूनंतर एक वर्षांनी मुंबई पोलिसांनी ही आत्महत्या होती असं म्हणत तिची केस बंद केली. पण त्या रात्री काय-काय झालं होतं याविषयी बोलताना रोहन म्हणाला-''दिशा खूप सेंसिटिव्ह व्यक्ती होती. त्यावेळी तिच्या कामाला घेऊन ती खूप तणावात होती. दोन महत्त्वपूर्ण डील्स तिच्या हातातून गेल्या होत्या. तिचं प्राण्यांवर खूप प्रेम होतं. केरळमध्ये एका गर्भवती हत्तीणीला २७ मे रोजी फटाक्यांनी भरलेलं अन्न खायला दिल्यानं तिचा मृत्यू झाला या बातमीनं दिशा खूप अस्वस्थ होती. तिला शांत करणं कठीण झालं होतं''.

''आम्ही दोन्ही कुटुंब दादरमध्ये रहायचो. ४ जूनला मी तिला म्हटलं की मालाडच्या फ्लॅटवर जाऊया. तिचा मूड बदलेल असा माझा विचार होता. आमच्या लग्नानंतर आम्ही तिथेच शिफ्ट होणार होतो. आमचे चार मित्रही तिथे आले होते,जेणकरून तिचा मूड बदलेल. दोन-तीन दिवस आम्ही भरपूर ड्रिंक्स केलं. दिशानं आपल्या ड्रिंकमध्ये काहीतरी मिक्स केल्याचं मी पाहिलं ज्यानं तिची अवस्था बिघडली''.

रोहन पुढे म्हणाला,'' दिशाला शेवटचा कॉल तिच्या शाळेतील मित्राचा लंडनहून आला होता. सगळं एकदम पाच मिनिटात घडलं. मी दिशाकडून फोन घेतला आणि त्या मित्राशी बोललो. दिशा त्यावेळी मास्टर बेडरुममध्ये निघून गेली. काही मिनिटांनी मी दरवाजा वाजवला पण आतून काहीच प्रतिसाद नाही मिळाला. मी दरवाजा उघडला तेव्हा पाहिलं की बिछाना ड्रिंक्सने भिजला होता. मला वाटलं ती आपले कपडे बदलतेय,येईल बाहेर आवरल्यावर''.

रोहन राय पुढे म्हणाला,''खूप वेळ झाला तरी दिशा आली नाही. आम्ही मित्रांनी मिळून पुन्हा दरवाजा वाजवला. पण काही रिस्पॉन्स नाही. मग मी बाथरुममध्ये गेलो. तिथे देखील ती नव्हती. संपूर्ण फ्लॅटमध्ये तिला शोधलं. तिचा वॉर्डरोब पाहिला. आणि टेन्शनमध्ये असतानाचा माझं लक्ष खोलीच्या उघडलेल्या खिडकीकडे गेलं. मी तिथून खाली पाहिलं की तिचा पायजमा ग्राऊंडवर दिसल्यासारखं झालं. मी मित्रांना ते पहायला बोलावलं,ओरडून विचारायला लागलो,काय दिसतंय ते? मी स्वतःच्या थोबाडीत मारायला सुरुवात केली. माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. ते सगळं एका वाईट स्वप्नासारखं होतं''.

रोहन पुढे म्हणाला, ''दिशाला त्या अवस्थेत पाहून मग मी ही खिडकीवर चढून तिथून उडी मारण्याच्या विचारात होतो. माझ्या मित्रांनी मला खेचून घेतलं. मग लगेच पोलिस तिथे पोहोचले. त्यांनी मला माझे कपडे काढायला सांगितले, दिशासोबत माझी काही लढाई झाली नव्हती ना हे त्यांन पहायचं होतं. आमच्या मित्रांनी दिशाला रुग्णालयात नेलं. पहिल्या दोन रुग्णालयांनी तिला दाखल करुन घेण्यास नकार दिला. तिसऱ्या रुग्णालयानं दाखल करुन घेतलं पण तिला मृत घोषित केलं''.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: अर्धशतकवीर पोरेलपाठोपाठ ऋषभ पंतही झाला बाद, दिल्लीचा निम्मा संघ परतला माघारी

राज्यसेवेला वर्णनात्मक पॅटर्न २०२५ पासूनच; बदल करण्याचा MPSCचा कुठलाही मानस नाही

Russia : पुतिन यांनी पाचव्यांदा घेतली रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ; आता पेलावी लागणार 'ही' आव्हाने

Latest Marathi News Live Update : PDCC बँकेवर आचारसंहिता भंगप्रकरणी गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT