Divya Khosla Kumar Injured Instagram
मनोरंजन

Divya Khosla Injured: अभिनेत्री दिव्या खोसलाला गंभीर दुखापत..अ‍ॅक्शन सीन द्यायला गेली अन् गालाचा नक्षाच बदलला..

अभिनेत्री दिव्या खोसला हिला शूटिंग करताना गंभीर दुखापत झाल्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले आहेत.

प्रणाली मोरे

Divya Khosla Kumar: अभिनेत्री आणि दिग्दर्शिका दिव्या खोसला कुमार अनेकदा चर्चेत आलेली दिसते. कधी थंडीत शुटिंग करताना कुडकुडतानाचा तिचा व्हिडीओ व्हायरल होतो तर कधी कुठल्या इव्हेंट्समध्ये आपल्या ग्लॅमरस अंदाजानं ती चाहत्यांना घायाळ करताना दिसते.

सोशल मीडियावर तर ती अनेकदा ग्लॅमरस फोटो शेअर करत थक्क करून सोडते. अर्थात यावेळी तिचे फोटो पाहून चाहत्यांना थोडा धक्का बसला आहे. तिचे लेटेस्ट पोस्ट खूपच घाबरवणारे आहेत.

जखमी होऊन लाल लाल झालेल्या चेहऱ्याचे फोटो तिनं शेअर केले आहेत,जे पाहिल्यानंतर जो तो ती लवकरच बरी होण्यासाठी प्रार्थना करत आहे.(Divya Khosla Injured while filming an action scene)

फोटोत दिव्याच्या चेहऱ्याला गालाच्या एका बाजूला गंभीर दुखापत झाल्याचे दिसत आहे. जखम खूप खोल दिसत नाहीय पण त्यामुळे तिचा चेहरा मात्र लालबुंद झालेला आहे.

दिव्यानं स्वतः फोटो शेअर करत लिहिलं आहे की-''आगामी प्रोजेक्टमध्ये अॅक्शन सीन करतेवेळी खूप वाईट पद्धतीनं मला दुखापत झाली. पण काम सुरू ठेवावं लागलं. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाची मला गरज आहे आणि या दुखापतीतून लवकर बरं होण्यासाठी ताकद देवानं द्यावी''.

दिव्याची ही अशी अवस्था पाहून तिच्या चाहत्यांनी चिंता व्यक्त केली. एका यूजरनं लिहिलं आहे की- 'अरे देवा..दीदी प्लीज तुझी काळजी घे. लवकर ठीक हो'.

तर आणखी एकानं लिहिलं आहे की,'तुम्हाला एका चांगल्या डॉक्टरची गरज आहे'. अभिनेता पर्ल वी पूरीनं दिव्याच्या फोटोवर कमेंट करत लिहिलं आहे की,'गेट वेल सून..गॉड ब्लेस'.

तर आणखी एकानं लिहिलं आहे-'यापेक्षा जास्त मला लागलंय ते देखील मम्मीचा मार खाऊन'.

अशा अनेक कमेंट्स दिव्याचे फोटो पाहून लोक करत आहेत.

हेही वाचा: हिंडेनबर्ग अहवालात तथ्य की ते भारताविरुद्धचे कारस्थान?

माहितीसाठी इथे सांगतो की दिव्यानं आपल्या त्या आगामी सिनेमाचं नाव सांगितलेलं नाही. पण कळतंय की ती लवकरच 'यारियां २' मध्ये दिसणार आहे. जी हिमांशू कोहली आणि रकुल प्रीत अभिनित हिट फिल्मची पुढची सीरिज आहे. ज्याला खोसला कुमारनं दिग्दर्शित केलं होतं.

आगामी सिनेमात दिव्यासोबत मीजान जाफरी आणि यश दास गुप्ता मुख्य भूमिकेत आहेत. वरीना हुसैन,प्रिया वारियर आणि पर्ल वी पुरी देखील या सिनेमात काम करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLA Car Bomb Attack : आमदार शौकत मोल्ला यांच्या कारवर बॉम्ब हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ!

T20 World Cup Group 2 Standing: इंग्लंडच्या विजयाने सुपर ८ च्या गटात मोठा उलटफेर; श्रीलंकेसह पाकिस्तानचंही वाढलं टेंशन; जाणून घ्या उपांत्य फेरीचं समीकरण

Talegaon Chakan Road: तळेगाव-चाकण मार्गावर युवक बनले ‘देवदूत’! तातडीच्या प्रयत्नांमुळे अपघात टळले, नेमकं काय घडलं!

Latest Marathi News Live Update : लाडकी बहिण योजना बंद होणार नाही- सुनेत्रा पवार

Missing Link project: मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ सुरू होताच टोल दरात बदल होणार का? नवीन नियम काय? महत्त्वाची माहिती आली समोर

SCROLL FOR NEXT