Divya Spandana reveals rahul gandhi helped her Google
मनोरंजन

Rahul Gandhi: आत्महत्या करणार होती ही साऊथ अभिनेत्री.. राहुल गांधींमुळे वाचला होता जीव.. १० वर्षांनी खुलासा..

कन्नड अभिनेत्री आणि माजी लोकसभा सांसद दिव्या स्पंदनानं नुकतंच एका टी.व्ही शो मध्ये राहुल गांधींविषयी मोठा खुलासा करत हैराण करुन सोडलं आहे.

प्रणाली मोरे

Rahul Gandhi: कन्नड अभिनेत्री आणि माजी लोकसभा सांसद दिव्या स्पंदनानं नुकताच खुलासा केला आहे की जेव्हा तिच्या मनात आत्महत्येचे विचार येत होते..तिचा त्या नकारात्मक विचारांशी संघर्ष सुरू होता तेव्हा कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी तिला भावनिकरित्या मोठा पाठिंबा दिला होता. ही गोष्ट तिनं कन्नड टी.व्ही शो मध्ये सांगितली आहे.

वडीलांच्या निधनानंतर दिव्या स्पंदना पूर्णपणे कोलमडली होती. तिला सतत मनात आत्महत्येचे विचार यायचे.

ती म्हणाली,''वडीलांच्या मृत्यूनंतर दोनच आठवड्यात मी संसदेत गेले होते. मी तिथे कोणालाच ओळखत नव्हते. मला काहीच माहित नव्हते. संसदेतील कामकाजासंदर्भातही मला काही माहित नव्हते''.(Divya Spandana reveals rahul gandhi helped her when she struggling with suicidal thoughts)

या दरम्यान दिव्या स्पंदनानं सांगितलं की तिनं आपलं दुःख विसरण्याचा प्रयत्न करत हळूहळू सगळं शिकायला सुरुवात केली. ती म्हणाली की,'' मला अनेकांनी आत्मविश्वास पुन्हा मिळवून द्यायचा प्रयत्न केला''. माहितीसाठी इथं सांगतो की दिव्या स्पंदना कॉंग्रेसची सोशल मीडिया हेड देखील राहिली आहे.

आत्महत्येचे विचार मनात येण्याविषयी ती म्हणाली की, जेव्हा तिच्या वडीलांचे निधन झाले तेव्हा तिला भावनिक पाठिंबा सर्वात जास्त दिला तो राहुल गांधी यांनी.

ती पुढे म्हणाली, ''माझ्या आयुष्यावर सर्वात जास्त छाप आहे ती माझ्या आईची,त्यानंतर माझे वडील आणि मग कुणी असेल तर ते आहेत राहुल गांधी''.

दिव्या स्पंदना म्हणाली की, वडीलांच्या मृत्यूनंतर ती आत्महत्या करण्याविषयी विचार करत होती आणि त्याच दरम्यान ती निवडणूक देखील हरली होती.

तिनं सांगितलं की,''त्या दरम्यान राहुल गांधी यांनी मला सहाय्य केलं आणि भावनिक दृष्ट्या देखील पाठिंबा दिला''.

दिव्या स्पंदनानं २०१२ साली यूथ कॉंग्रेस जॉइन केलं होतं. २०१२ साली कर्नाटकच्या मांड्या लोकसभेच्या सीटसाठी झालेल्या निवडणुकीत ती लढली आणि जिंकली देखील. अर्थात गेल्याच वर्षी दिव्यानं सिनेइंडस्ट्रीत पुन्हा पदर्पण केलं आहे. तिनं आपलं स्वतःचं प्रोडक्शन हाऊसही काढलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajiv Gandhi : अन् राजीव गांधी मुंबईतून गेले ते कायमचेच! राजभवनातील माजी अधिकाऱ्याने सांगितली शेवटच्या भेटीची आठवण

Beed Crime: सुरेश धस यांचे कार्यकर्ते आहोत, असं म्हणत एकाला बेदम मारहाण; शिरुरमध्ये नेमकं काय घडलं?

Rain-Maharashtra Latest Live News Update: मराठवाड्यात मोठी धरणे आणि प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्याच्या दिशेने

Jalgaon Crime : जळगावात कौटुंबिक वादातून धक्कादायक घटना; पतीने पत्नीवर कुऱ्हाडीने हल्ला करत संपवले जीवन

होम्बळे फिल्म्सने 'कांतारा: अध्याय 1' मध्ये गुलशन देवय्या यांची 'कुलशेखर' या भूमिकेत केली घोषणा

SCROLL FOR NEXT