Diya aur baati fame actress kanishka soni trolls targeting her for marrying herself Instagram
मनोरंजन

'सेक्ससाठी पुरुषाची गरज नाही तर..', कनिष्का सोनीचा ट्रोलर्सवर पलटवार

कनिष्का सोनीनं काही दिवसांपूर्वी एक पोस्ट करत स्वतःशीच लग्न केल्याचं सोशल मीडियावर जाहीर केलं होतं.

प्रणाली मोरे

Kanishka Soni: अभिनेत्री कनिष्का सोनीनं सिंदूर आणि मंगळसूत्र घालून स्वतःशीच लग्न केल्याचे जाहीर करणारी फोटो पोस्ट केल्यानंतर सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा झाली. तिला ट्रोलही केलं गेलं,पण आता कनिष्कानं ट्रोलर्सला यावरनं चांगलंच सुनावलं आहे.(Diya aur baati fame actress kanishka soni trolls targeting her for marrying herself)

कनिष्का सोनीनं एका व्हिडीओच्या माध्यमातून म्हटलं आहे, ''मी पाहिलं की माझ्या पोस्टवर खूप विचित्र कमेंट्स लोक करत आहेत,मी स्वतःशीच लग्न केलं आहे असं म्हटल्यानंतर माझ्या त्या पोस्टवर हे असे गलिच्छ भाषेतील कमेंट्स वाचायला मिळत आहेत. मी माझा निर्णय खूप विचार करुन घेतला आहे. कितीतरी लोकांनी मला म्हटलं की मी विज्ञानाला दुय्यम लेखतेय,ते मला विचारत आहेत की सेक्स कोणासोबत करशील. मी हे विचारणाऱ्यांना सांगू इच्छिते की विज्ञान आणि तंत्रज्ञानानं खूप प्रगती केली आहे आणि आता महिलांना सेक्स करण्यासाठी पुरुषाची गरज नाही''.

कनिष्कानं आपल्या त्या व्हिडीओत स्वतःशीच लग्न का केलं याचं कारणही सांगितलं आहे. ती म्हणाली-'' मी गुजरातमधील एका मध्यवर्गीय कुटुंबातील मुलगी आहे. लग्न करायचं स्वप्न माझं देखील होतं. पण माझ्या आयुष्यात मला हवा तसा जोडीदार मिळाला नाही,जो आपल्या दिलेल्या वचनाशी एकनिष्ठ राहील. मला एक गोष्ट नेहमीच दिसून आली आहे की पुरुष जे बोलतात,त्यावर टिकून राहत नाहीत. म्हणून माझं ठाम मत आहे की मी माझं संपूर्ण आयुष्य पुरुषाशिवाय राहू शकते. जर मी स्वतः कमवत आहे तर मला कशाला कोणत्या पुरुषाची गरज आहे. मी स्वतंत्र स्त्री आहे. मी माझ्या गरजा आणि स्वप्न स्वतः पूर्ण करू शकते''.

कनिष्का असं देखील म्हणाली की ९० टक्के महिला लग्न करून खूश नाहीत. मला पुरुषांवर आता विश्नासच राहिला नाही.कनिष्कानं आपल्या व्हिडीओला शेअर करत एक मोठी पोस्टही लिहिली आहे. तिनं लिहिलं आहे-''लग्न म्हणजे फक्त सेक्स नाही. यामध्ये प्रेम आणि ईमानदारी असायला हवी. आणि माझ्यात तो विश्वासच आता राहिला नाही. माझं मत आहे की एकटं राहून आपण स्वतःवर अधिक प्रेम करू शकतो,जेव्हा बाहेरुन ते मिळणं कठीण होऊन बसतं. माझी पोस्ट ट्रेंड केल्यासाठी आणि चर्चेत आणण्यासाठी मी सर्वांचे आभार व्यक्त करते. मला असं करायचं नव्हतं खरंतर''.

कनिष्कानं पुढे लिहिलं आहे की-''काही लोक म्हणाले आहेत की मी पोस्ट केली तेव्हा मद्यधुंद अवस्थेत असेन,ड्रग्ज घेतली असेल, पण मी सांगू इच्छिते की मी मनापासून भारतीय आहे, गेली अनेक वर्ष फिल्म इंडस्ट्रीत राहूनही मी कधीच मद्य प्राशन केलं नाही ना मला इतर दुसरं कुठलं व्यसन आहे. मी स्वतःशीच लग्न करण्याचा निर्णय खूप विचारपूर्वक घेतला आहे. मी खूश आहे की मी आता अमेरिकेत राहत आहे आणि हॉलीवूडमध्ये माझं करिअर करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shreyas Iyer च्या जीवाला होता धोका, BCCI च्या मेडिकलने टीमने वेळीच पावलं उचलली नसती, तर...

Latest Marathi News Live Update : कराडच्या माजी नगराध्यक्षा शारदा जाधव भाजपामध्ये

Video : ईश्वरी करणार राकेशचा अर्णवच्या खुनाचा प्लॅन फेल; प्रोमो पाहून प्रेक्षक म्हणाले "सगळे मठ्ठ आहात का ?"

Crime News : भारतीयांनो परत जा म्हणत भारतीय महिलेवर अत्याचार; 'या' देशात घडलेल्या घटनेने जग हादरले, हल्लेखोर थेट घरात घुसले अन्…

ठरलं! ‘कांतारा चॅप्टर 1’ वीकेंडला OTT प्लॅटफॉर्मवर करणार एन्ट्री, तारिख जाणून घ्या!

SCROLL FOR NEXT