'Don't compare my baby with Sridevi'; Janhvi Kapoor's father Boney Kapoor defends his daughter Instagram
मनोरंजन

Boney Kapoor: 'जान्हवीची तुलना श्रीदेवीसोबत करू नका, माझ्या लेकीने तर..', बोनी कपूर स्पष्टच बोलले...

'मिली' सिनेमाच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्यात बोनी कपूर यांनी जान्हवीचं भरभरून कौतुक केलं. तर याचवेळी त्यांनी प्रेक्षकांना एक विनंती देखील केली.

प्रणाली मोरे

Boney Kapoor: बोनी कपूर यांच्या 'मिली' या सिनेमाचा थरारक ट्रेलर नुकताच रिलीज झालाय. या सिनेमात त्यांचीच मुलगी म्हणजेच अभिनेत्री जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत आहे. जान्हवी पहिल्यांदाच तिच्या वडिलांसोबत काम करतेय. 'मिली' सिनेमाचा ट्रेलर लॉन्च होताच सगळीकडे सिनेमाची चर्चा सुरू झाली आहे. या सिनेमाच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्यात बोनी कपूर यांनी जान्हवीचं भरभरून कौतुक केलं. तर याचवेळी त्यांनी प्रेक्षकांना एक विनंती देखील केली. जान्हवीची तुलना तिच्या आईसोबत म्हणजेच दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्याशी करू नये असं ते म्हणाले. यावेळी बोनी कपूर लेकीचं कौतुक करण्यात इतके वाहवत गेले की शेवटी जान्हवीलाच त्यांना थांबवावं लागलं.(Sridevi'; Janhvi Kapoor's father Boney Kapoor defends his daughter)

जान्हवी कपूर आपल्या आईच्या पावलांवर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्राकडे वळली. 'धडक' या सिनेमातून तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. तिच्या सौंदर्याने कायमच सगळ्यांना भुरळ घातली. मात्र असं असलं तरी अभिनयाच्या बाबतीत मात्र जान्हवीची तिच्या आईशी म्हणजेच दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्यासोबत तुलना केली गेली.

श्रीदेवी यांच्यासारखा अभिनय जान्हवीला जमत नाही असं म्हणत तिला अनेकदा ट्रोलही केलं गेलंय. यावर आता बोनी कपूर यांनी मौन सोडत जान्हवीला पाठिंबा दिला आहे. ते म्हणाले "आपली भूमिका समजून ती मांडण्याची प्रत्येकाची एक वेगळी पद्धत असते. प्रत्येक भूमिकेत पूर्णपणे शिरून ती साकारणं ही श्रीदेवी यांची खासियत होती. जान्हवीने देखील ते आत्मसात केलं आहे. ती केवळ भूमिका साकारत नाही तर त्या भूमिकेशी एकरूप होते. तिची प्रगती तुम्ही दिवसेंदिवस पहात आहातच."

पुढे ते म्हणाले "श्रीदेवीने बालकलाकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती. दक्षिणेत दीडशे ते दोनशे सिनेमा केल्यानंतर उत्तर भारतातील लोकांनी तिला हिंदी सिनेमात पाहिलं. प्रत्येक भूमिका समजून घेण्यात ती हुशार होती. माझ्या मुलीनं तर आत्ताच प्रवास सुरू केला आहे. त्यामुळे कृपया तिची तुलना तिच्या आईच्या कोणत्याही कामाशी करू नका."

दरम्यान 4 नोव्हेंबरला 'मिली' हा सिनेमा चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.राष्ट्रीय पुरस्कार विजेते मथुकुट्टी झेवियर या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत. 2019 सालातील त्यांच्याच 'हेलन' या मल्याळम सिनेमाचा 'मिली' हा रिमेक आहे. जान्हवी कपूर सोबतच या सिनेमात अभिनेता मनोज पाहवा आणि सनी कौशल प्रमुख भूमिकेत झळकतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025 Super 4 Schedule: भारतीय संघ कोणत्या तारखांना कोणाला भिडणार? जाणून घ्या सुपर ४ चं संपूर्ण वेळापत्रक

AFG vs SL Live: लक्ष्य १७० धावांचे, पण १०१ धावा करताच श्रीलंका पोहोचली Super 4 मध्ये; अफगाणिस्तानला लटकवले, कसे ते घ्या जाणून...

Adani Group News : अदानी समूहाला मोठा दिलासा; 'SEBI'ने 'हिंडेनबर्ग'चे आरोप फेटाळले!

Khadakwasla Dam : खडकवासला धरणातून ३१ तासांनी १२६३ क्युसेक विसर्ग सुरू

AFG vs SL Live : 6,6,6,NB,6,6,1w! ४० वर्षीय मोहम्मद नबीची वादळ खेळी; ६ चेंडूंत केलेल्या ५ धावा, नंतर १६ चेंडूंत ५५ धावांचा पाऊस Video

SCROLL FOR NEXT