Double XL Movie  esakal
मनोरंजन

Double XL Movie: 'कपिल कोणत्या आंटीसोबत लग्न करतोय'! पत्नीनचं केला खुलासा

भारतीय क्रिकेट संघातील प्रसिद्ध खेळाडू आणि माजी कर्णधार कपिल देव यांच्याविषयी जेवढं सांगावं अन् बोलावं तेवढं कमी आहे.

सकाळ डिजिटल टीम

Double XL movie Kapil Dev wife Romi Bhatia: भारतीय क्रिकेट संघातील प्रसिद्ध खेळाडू आणि माजी कर्णधार कपिल देव यांच्याविषयी जेवढं सांगावं अन् बोलावं तेवढं कमी आहे. १९८३ साली क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारताला मोठा विजय मिळवून देणाऱ्या कपिल यांच्याविषयी क्रिकेट चाहत्यांच्या मनात कायमच कौतूकाची आणि आदराची भावना असते. करडी शिस्त, परखडपणा आणि मनमिळावू व्यक्तिमत्व म्हणून कपिल यांच्याकडे पाहिले जाते.

क्रिकेट सोडून इतर क्रीडाप्रकारातही कपिल यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामध्ये गोल्फचा उल्लेख करता येईल. सध्या कपिल देव हे चर्चेत आले आहे याचे कारण म्हणजे त्यांची पत्नी रोमी यांनी केलेलं अजब विधान. काही महिन्यांपूर्वी आलेल्या ८३ नावाच्या चित्रपटातून कपिल देव त्यांची टीम आणि भारतीय संघानं कशाप्रकारे विश्वकरंडकाला गवसणी घातली याचा प्रवास रेखाटण्यात आला होता. त्यामध्ये कपिल देव यांची भूमिका प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंग तर रोमी यांची भूमिका दीपिकानं केली होती.

डबल एक्स एल या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला क्रिकेटविश्वातील हे प्रसिद्ध जोडपे उपस्थित होते. स्क्रिनिंग झाल्यानंतर पत्रकारांनी रोमी यांना या चित्रपटाविषयी प्रतिक्रिया विचारली होती. त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर हे अनेकांना चकीत करुन गेले आहे. त्या म्हणाल्या. माझं जेव्हा कपिलशी लग्न ठरलं होतं, त्यावेळी माझ्यावरुन कपिल यांना खूप टीका सहन करावी लागली होती. कपिल नेमकं कुठल्या व्यक्तीशी लग्न करतोय असा प्रश्न त्यांच्या घरच्यांना पडला होता. त्यावरुन रोमी यांनी गंमतीशीर प्रतिक्रिया दिली आहे.

डबल एक्स एलमध्ये देखील कपिल देव आणि रोमी भाटिया यांचा गेस्ट अॅपिरियन्स प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. माझ्या आणि कपिलच्या लग्नावरुन वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या जात होत्या. कपिल हा कोणत्या आंटीशी लग्न करतोय. असंही अनेकजण म्हणाले होते. या शब्दांत रोमी यांनी आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

Supreme Court March : राहुल गांधींनी व्हिडिओ शेअर करत दिली देशवासियांना 'चलो दिल्ली'ची हाक; सरन्यायाधीशांकडे दाद मागणार

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

Mumbai Protest: मुंबईत वातावरण तापलं, ठाकरे कुटुंब पोलीस स्थानकात; व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT