Dr. Amol Kolhe Reaction On Akshay Kumar Chhatrapti Shivaji Maharaj Role. Esakal
मनोरंजन

Dr. Amol Kolhe: 'मला वाटतं...', महाराजांच्या भूमिकेत अक्षयला पाहून डॉ. अमोल कोल्हे स्पष्टच बोलले

'वेडात मराठे वीर दौडले सात' या मराठी सिनेमात अक्षय कुमार छत्रपती शिवजी महाराजांच्या भूमिकेत दिसला अन् ट्रोलर्सनी निशाणा साधला.

प्रणाली मोरे

Dr. Amol Kolhe: मराठीतला सध्याचा सगळ्यात मोठा सिनेमा म्हणून महेश मांजरेकर दिग्दर्शित 'वेडात मराठे वीर दौडले सात' या सिनेमाकडे पाहिलं जात आहे. सिनेमा लॉंचिग सोहळ्यापासूनच वादात सापडला आहे.

ट्रोलर्स अगदी छोट्या-छोट्या गोष्टीवरनं सिनेमातील चुका काढताना दिसत आहेत. सुरुवातीला मांजरेकरांचा मुलगा सत्या मांजरेकर याच्या दिसण्यावरनं,हावभावावरनं त्याला खूप बोललं गेलं आणि आता अक्षय कुमारचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पेहरावातला लूक समोर आल्यापासून त्याला टीका करून करून झोडपलं जात आहे.

अनेकांना अक्षय कुमार शिवाजी महाराजांच्या भूमिकेत आवडलेला नाही. तसं बऱ्याच जणांनी बोलूनही दाखवलं. (Dr. Amol Kolhe Reaction On Akshay Kumar Chhatrapti Shivaji Maharaj Role.)

आता अनेक मालिका,सिनेमांमधून छत्रपती शिवाजी महाराज साकारत जनमानसात प्रसिद्ध झालेल्या खासदार आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हेंनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. नुकतीच महाविकास आघाडीच्या खासदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्या भेटीनंतर अमोल कोल्हे यांनी एका टी.व्ही वाहिनीशी संवाद साधला. त्यावेळी अमोल कोल्हे यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत अक्षय कुमार कसा दिसत आहे असे विचारले तेव्हा ते म्हणाले, ''मी गेली चौदा ते पंधरा वर्ष अभिनय क्षेत्रात काम करत आहे. बऱ्याचदा छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याचं भाग्य मला लाभलं''.

''एखाद्या अभिनेत्यासाठी केवळ भूमिका महत्त्वाची असते तर एखाद्यासाठी तो त्याचा ड्रीम रोल असू शकतो. माझ्यासाठी एखाद्या भूमिकेला सामोरं जाताना शारिरीक-मानसिक तयारी करून जाणं महत्त्वाचं असतं. मला वाटतं ती नैतिक जबाबदारी आहे,असं मी तरी समजतो. इतर कोणी काय करावं,हे एखाद्या मोठ्या अभिनेत्याला मी सांगू शकत नाही''.

हेही वाचा: Digital Rupee India : देशाचे नवे पर्यायी चलन ‘डिजिटल रुपी’

अक्षय कुमारनं त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमातील फर्स्ट लूक पोस्ट करत,सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाल्याचं म्हटलं होतं. अक्षयनं पोस्ट केलेल्या व्हिडीओतील त्याचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील लूक पाहून अनेक नेटकऱ्यांना तो खटकला. अन् त्याला जोरदार ट्रोल केले जाऊ लागले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayodhya Utsav 2025 : अयोध्येत दीपोत्सव! राम मंदिर प्राणप्रतिष्ठेचा दुसरा वर्धापन दिन; राजनाथ सिंह आणि योगींच्या हस्ते महापूजा

Nomination Rejection News : भावी नगरसेवकांसाठी आजचा गेमचेंजींग दिवस, महापालिका निवडणुकीसाठी छाननी होणार, कोणाचे अर्ज होणार अवैध

Latest Marathi News Update : पुण्यात थंडीसोबत धुकेही वाढले, तीन विमानांची उड्डाणे रद्द

Vijay Hazare Trophy: नाशिकचा गोलंदाज इतिहास घडवतोय! 'अशी' कामगिरी करणारा महाराष्ट्राचा पहिला गोलंदाज ठरला

Pregnancy Criminalization Case : बाळाचा गर्भातच मृत्यू, महिलेला १८ वर्षांची शिक्षा, पण आता या एका दाव्याने निकाल पलटला; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT