dr. tatyarao lahane and dwarkanath sanzgiri participate in kon honar crorepati on sony marathi sakal
मनोरंजन

लाखो शस्त्रक्रिया करणारे डॉ. तात्याराव लहाने म्हणाले, ही मधुबाला कोण?

पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने आणि सुप्रसिद्ध लेखक द्वारकानाथ संझगिरी 'कोण होणार करोडपती'च्या हॉटसीटवर..

नीलेश अडसूळ

kon honare crorepati : दृष्टिहीन माणसं जास्त डोळसपणे वागतात, बोलतात आणि खेळतात असं म्हणता तर क्रिकेट या खेळाचं भारतामध्ये अनोखं आकर्षण आहे. दृष्टिहीन माणसांना देखील या खेळाने भुरळ घातली. 'क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड ऑफ महाराष्ट्र' अशा संस्था दृष्टिहीन खेळाडूंना शिकवतात आणि खेळण्यासाठी प्रेरित करतात. 'क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड ऑफ महाराष्ट्र' या संस्थेला मदत म्हणून सोनी मराठी (sony marathi) वाहिनीवरील 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमात नेत्र शल्य चिकित्सक पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने आणि सुप्रसिद्ध लेखक, क्रिकेट विश्लेषक द्वारकानाथ संझगिरी येत्या शनिवारच्या भागात सहभागी होणार आहेत. या दोघांचेही अनुभव विश्व प्रचंड मोठे असल्याने हा भाग अत्यंत रंगतदार झाला आहे.

(dr. tatyarao lahane and dwarkanath sanzgiri participate in kon honar crorepati on sony marathi)

'कोण होणार करोडपती'च्या याही पर्वात दर आठवड्यातल्या शनिवारच्या भागात विशेष पाहुणे सहभागी होतात. समाजाच्या कल्याणासाठी झटणाऱ्या सामान्यांमधल्या असामान्य व्यक्तींची भेट आणि त्यांचे कार्य या विशेष भागांतून प्रेक्षकांसमोर येते. आत्तापर्यंत काजोल, तनुजा, अशोक सराफ, सुधा मूर्ती यासारखे मान्यवर उपस्थित राहिले होते. या आठवड्यातील विशेष भागात डॉ. तात्याराव लहाने आणि द्वारकानाथ संझगिरी सहभागी होणार आहेत. आरोग्यसेवेसाठी राज्यभरात ओळखले जाणारे डॉ. तात्याराव लहाने यांनी एक लाख पासष्ट हजारापेक्षा जास्त शस्त्रक्रिया यशस्वीपणे केल्या आहेत. तर तेहेतीस वर्ष महानगरपालिकेत नोकरी करून स्वतःची लिखाण, क्रिकेटची आवड जपत द्वारकानाथ संझगिरी यांनी कलाक्षेत्रात मुक्त मुशाफिरी केली आहे.

या कार्यक्रमात डॉ. तात्याराव लहाने यांनी लहानपणी डॉक्टर व्हायचं का ठरवलं, याचा गमतीशीर किस्सा तसेच त्यांनी त्यांच्या आयुष्यात केलेली पहिली शस्रक्रियेचा अनुभव सांगितला. आजच्या पिढीला परिचित नसलेल्या सुकडी आणि तरवट्याच्या भाजीबद्दल सांगताना त्यांनी गावाकडच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. तर द्वारकानाथ यांनी क्रिकेट क्षेत्र का निवडलं, समीक्षण करतो हे वडिलांपासून लपवून का ठेवलं असे किस्से सांगत त्यांचा प्रवास सांगितला.

हिंदुहृदय बाळासाहेब ठाकरे आणि गोपीनाथ मुंडे यांच्यावर केलेल्या उपचारांचा अनुभवही यावेळी लहाने यांनी सांगितला. विशेष म्हणजे जगप्रसिद्ध अभिनेत्री मधुबाला म्हणजे कोण हे देखील लहाने यांना माहीत नव्हते, अशी धक्कादायक पण गामितीशीर बाबा त्यांनी उगड केली. हे 'मधुबाला' प्रकरण नेमकं काय आहे ते आपल्याला 16 जुलैच्या भागात कळणार आहे. याशिवाय सामाजिक, राजकीय आणि क्रिकेट विश्वातील अनेक मनोरंजक किस्से या दोन दिग्गजांनी उघड केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Changur Baba : अंगठ्या अन् रत्न विकायचा, ५ वर्षात जमवली १०० कोटींची माया; धर्मांतर रॅकेट प्रकरणी अटक केलेला छांगुर बाबा कोण?

बौद्ध धर्मगुरू दलाई लामांना 'भारतरत्न' देण्याची मागणी; 80 खासदारांनी केली पाठिंबा दर्शवणारी स्वाक्षरी, मोदी सरकार घेणार लवकरच निर्णय?

Guru Purnima 2025: गुरुपौर्णिमेला का घेतात दीक्षा, जाणून घ्या 'या' दिवशी दीक्षेचे महत्त्व

Oxford Graduate: ऑक्सफर्ड विद्यापीठाचा पदवीधर करतोय फूड डिलिव्हरी; दरमहा कमावतोय लाखो रुपये, म्हणाला...

Solapur Crime: निर्दयी मुलाने बापाला चाबकाचे फटके देऊन संपविले, घरात रक्ताचा पाट वाहिला तरी...सोलापूर हादरले !

SCROLL FOR NEXT