Dr.Amol Kolhe Post On Red Fort, Marathi Movie shooting experience
Dr.Amol Kolhe Post On Red Fort, Marathi Movie shooting experience Esakal
मनोरंजन

'आग्र्याच्या लाल किल्ल्यात शूटिंग? कसं शक्य?', डॉ.अमोल कोल्हे पोस्ट चर्चेत

प्रणाली मोरे

डॉ.अमोल कोल्हे(Dr. Amol Kolhe) राष्ट्रवादीचे नेते असले तरी त्यांनी आपला अभिनय सोडलेला नाही. वेगवेगळ्या ऐतिहासिक भूमिकांच्या माध्यमातून ते आपल्या भेटीस येतच असतात. पण राजकारणात(Politics) गेल्यापासून ते सोशल मीडियावर केवळ मनोरंजन नाही,तर राजकारण,सामाजिक विषयांवरही व्यक्त होताना दिसतात. त्यावरनं अनेकदा वादग्रस्त चर्चा रंगलेल्या देखील आपण पाहतो. आता पुन्हा डॉ.अमोल कोल्हेंची एक पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे. डॉ.अमोल कोल्हे म्हणालेत,'आग्र्याच्या लाल किल्ल्यात शूटींग? कसं शक्य आहे?' या पोस्टमुळे मात्र अनेकांना अनेक शंका येऊ लागल्यात,नेमकं कोल्हेंसोबत शूटिंग(Shooting) करताना झालं काय की ही पोस्ट करण्याची वेळ त्यांच्यावर आली. शेवटी आग्र्याचा लाल किल्ला आपल्या इतिहासातलं एक महत्त्वाचं पर्ण,त्याच्यासाठी असं का बरं लिहिलं कोल्हेंनी? चला जाणून घेऊया पोस्टविषयी सविस्तर पणे. (Dr.Amol Kolhe Post On Red Fort, Marathi Movie shooting experience)

डॉ. अमोल कोल्हेंनी आपल्या फेसबूक अकाउंटवर जी पोस्ट केली आहे ती एका सिनेमाच्या शूटिंग निमित्तानं. हा सिनेमा आहे 'शिवप्रताप गरुडझेप'. ज्या सिनेमात डॉ. कोल्हे पुन्हा आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी त्यांच्या या महत्त्वाकांक्षी सिनेमाच्या प्रोजेक्ट संदर्भात माहिती देत त्याचा उत्सुकता वाढवणारा टिझरही प्रदर्शित केला होता.

ही पोस्ट करताना डॉ कोल्हे एक व्हिडीओ देखील पोस्ट केला आहे. ज्यामध्ये ते ट्रॉलीच्या मदतीनं उंचावर जात भव्य-दिव्य अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत आहेत. हा व्हिडीओ पोस्ट करत डॉ.कोल्हे यांनी आपल्या शूटिंगच्या वेळचा लाल किल्ल्यातला अनुभव शेअर केला आहे.

डॉ. अमोल कोल्हे यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की,''अशा वातावरणात शूटींग करणे म्हणजे वेडेपणा आहे, आग्र्याच्या लाल किल्ल्यात शूटींग? कसं शक्य आहे? अनेकांच्या अनेक शंका.... पण प्रत्यक्ष इतिहास जणू 356 वर्षांनंतर त्या घटनेला कॅमेऱ्याच्या लेन्स मधून पाहणार होता.. ASI नियमावलीचे पालन करता करता होणारी दमछाक, त्यात 38-40 डिग्री असलं तरी 70% आर्द्रतेमुळे 42-44 वाटणारं तापमान ते ही सकाळी 9 वाजता, चुकून टाचणी विसरली तरी किल्ल्यातून base camp पर्यंत पायपीट, ना बसायला खुर्ची ना पंखा.. सावलीसाठी आडोशाला उभं राहावं तर घामाच्या धारा आणि जरा हवेशीर ठिकाणी उभं राहावं तर उन्हाच्या झळा..रोज 4-5 जण अंथरूण धरायचे नाहीतर थेट हॉस्पिटल मध्ये.. तरी पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी ' बचेंगे तो और भी लडेंगे' या ईर्षेने शूटिंग सुरु...''

''पण यात खरं कौतुक करायला हवं ते आमच्या टीम मधील सेटिंग boys, spot boys, light boys, costume dept, direction team, camera team ani junior artists चं..कारण या सर्व प्रतिकूलतेत ते सर्वजण ठाम होते.. महाराजांच्या पेहरावात मी जेव्हा लाल किल्ल्यात पाऊल ठेवलं तेव्हा भारावलेले, अगदी डोळे भरून तो प्रसंग डोळ्यात साठवणारे आणि 356 वर्षांपूर्वी घडलेल्या इतिहासाच्या पुनर्प्रत्ययाचे ते सर्वजण पहिले साक्षीदार होते...'Strenght of a Chain is judged by the strength of weakest link in the chain' या उक्ती प्रमाणे टीमची ताकद दाखवून देत होते आणि आमचा टीम leader, आमचा दिग्दर्शक कार्तिक केंढे तर पहाडासारखा त्या प्रतिकूलतेच्या छाताडावर पाय ठेवून उभा होता..''

''मला जाणवत होतं की आपापल्या परीने प्रत्येक मावळा लढत होता..आणि प्रत्येकाची प्रेरणा लाल किल्ल्याकडे स्वाभिमानी नजर रोखून ताठ मानेने उभी होती... शतकानुशकं अजरामर प्रेरणा - छत्रपती शिवाजी महाराज!'' कोल्हे यांची पूर्ण पोस्ट वाचल्यावर आपल्या शंकांना उत्तर मिळतंच,पण इतिहासाच्या साक्षीनं शूटिंगचे कष्टदायी अनुभव घेणं त्यानं कृतकृत्य होणं याचही एक वेगळाच आनंद असतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT