मनोरंजन

‘फिरस्त्या’ची प्रदर्शनापूर्वीच ५४ पुरस्कारांची कमाई

समाधान काटे

पुणे : कठीण काळात जीवनातील संघर्षाला सामोरे जाण्याचा संदेश देणाऱ्या ‘फिरस्त्या’ या मराठी चित्रपटाने प्रदर्शित होण्यापूर्वीच देशासह परदेशात मिळून ५४ पुरस्कारांची कमाई केली आहे.
स्वीडन देशातील लुलिया इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाला पहिला पुरस्कार मिळाला.

‘अर्जेन्टिना’मधील ८ व्या कॉन्स्ट्रुइर सिने इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये निवड झाली आहे. या फेस्टिव्हलच्या ६ विभागांतील स्पर्धेसाठी जगभरातील ३५ देशांतील एकूण २५०० हून अधिक चित्रपटांनी अर्ज केला होता. यात ४४ चित्रपटांची निवड करण्यात आली. पुणे आयकर विभागाचे सहआयुक्त विठ्ठल भोसले यांनी या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन केले आहे. त्यांच्या पत्नी डॉ. स्वप्ना भोसले या निर्मात्या आहेत.

याबाबत विठ्ठल भोसले म्हणाले, हा चित्रपट ग्रामीण भागात निरक्षर आणि आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या कुटुंबात जन्माला आलेल्या मुलाची खऱ्या अनुभवांवर आधारित प्रेरणादायी गोष्ट आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून शिक्षण, रोजगार, स्व-कर्तृत्व, स्वावलंबीत्व सारख्या महत्त्वाच्या विषयांबद्दल युवा पिढीची वाढती अनास्था, मरगळ घालवण्याचा प्रयत्न केला आहे.

या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून १८ पुरस्कार, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक विभागात १७ पुरस्कार, सर्वोत्कृष्ट अभिनेता यासाठी ७, सर्वोत्कृष्ट पटकथेसाठी ६, सर्वोत्कृष्ट छायाचित्रणासाठी ३, सर्वोत्कृष्ट पदार्पण या विभागात २ पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट संकलनासाठी १ पुरस्कार असे ५४ पुरस्कार मिळालेले आहेत. तसेच फिरस्त्याची अमेरिका, रशिया, फ्रान्स, स्वीडन आणि तुर्की या पाच देशांतील फिल्म फेस्टिव्हल्समध्ये अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Recruitment 2025: राज्यात मेगाभरती! मुख्यमंत्र्यांची घोषणा; भरती प्रक्रियेचे नियम बदलणार

Latest Maharashtra News Updates : ..मग महाराष्ट्रात भाषे वरून भांडणे का लावली जात आहेत? - संजय राऊतांचा सवाल!

Farmer Situation : औसा तालुक्यातील शिवणी (बु.) येथील वृद्ध शेतकरी दांपत्य ओढताहेत हाताने कोळपे

टीआरपीमध्ये अचानक वर आली 'ही' मालिका; 'या' मालिकांना टाकलं मागे; अभिनेत्याने केली खास पोस्ट

Aditya Thackeray Vs BJP : ‘’भाजप 'त्या' थर्ड क्लास दर्जाच्या लोकांना बडतर्फ करणार का? की...’’; आदित्य ठाकरेंचा सवाल!

SCROLL FOR NEXT