Eknath Shinde Kshitish Date Dharmaveer movie Sakal
मनोरंजन

'धर्मवीर'मध्ये एकनाथ शिंदेंची भूमिका करणारा अभिनेता संतापला; म्हणाला...

राज्यातल्या राजकीय खलबतांवर अनेक अभिनेते व्यक्त होत आहेत.

वैष्णवी कारंजकर

एकनाथ शिंदेंचं बंड आणि त्या पार्श्वभूमीवर राज्यात सुरू असलेला गोंधळ या सगळ्याची चर्चा आता देशभरात होत आहे. या गोंधळाबद्दल अनेक अभिनेतेही चर्चा करत आहेत. अशातच आता धर्मवीर या चित्रपटात एकनाथ शिंदेंची भूमिका करणाऱ्या अभिनेत्याने एका गोष्टीबद्दल संताप व्यक्त केला आहे. (Kshitish Date, Actor who played the role of Eknath Shinde in Marathi movie Dharmaveer)

धर्मवीर या आनंद दिघे (Shivsena leader Anand Dighe) यांच्या आयुष्यावरच्या चित्रपटात अभिनेता क्षितीश दातेने (Eknath Shinde) यांची भूमिका साकारली आहे. त्याने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमधून आपला संताप व्यक्त केला आहे. क्षितीशने इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे एक पोस्ट केली आहे. त्याने एका वर्तमानपत्रातल्या कात्रणाचा फोटो शेअर केला आहे. यात छापून आलेला एक फोटो दिसतोय. या फोटोत 'थोडे दिवस मलाच एकनाथ समजून बैठकीत घ्या' असं लिहिलेलं आहे. त्याबद्दल क्षितीशने संताप व्यक्त केला आहे.

Kshitish Date Instagram

हा फोटो शेअर करत क्षितीश (Actor Kshitish Date) म्हणतो की मोठी राजकीय उलाढाल सध्या चालू आहे. चेष्टेत मीम्स येणं वेगळं आणि वर्तमानपत्रात छापणं हे वेगळं. असं छापणं चूक आहे. या वर्तमानपत्रात एक मीम छापून आल्याने क्षितीश चिडला आहे. क्षितीशने नुकत्याच प्रदर्शित झालेल्या धर्मवीर या चित्रपटात एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारली आहे. तर आनंद दिघे यांच्या प्रमुख भूमिकेत अभिनेता प्रसाद ओक (Actor Prasad Oak) आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari: ‘भूमिपुत्रांना रोजगार द्या, त्यांचं आयुष्य समृद्ध करा’; आ. अमोल मिटकरी यांची विधान परिषदेत ठाम मागणी

Manoj Kayande : अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या; आमदार मनोज कायंदे यांची अधिवेशनात मागणी

KDMC Revenue Department : कल्याण - डोंबिवली खाडी किनारी महसूल विभागाची कारवाई; 30 लाखांचा मुद्देमाल केला नष्ट

"मृत्युपत्र तयार ठेवलंय" एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या अभिनेत्याची पोस्ट व्हायरल, म्हणाला..

Latest Maharashtra News Updates : सोमनाथच्या मृत्यू संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT