Ekta Kapoor cries at goodbye trailer launch as she talks about her biggest fear  Google
मनोरंजन

भर कार्यक्रमात एकता कपूरला कोसळलं रडू, म्हणाली,'लोक कसं सहन करतात की...'

एकता कपूरनं 'गूडबाय' सिनेमाची निर्मिती केली आहे. या सिनेमाच्या ट्रेलर लॉंच दरम्यानचा एकताचा हमसाहमशी रडतानाचा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला आहे.

प्रणाली मोरे

Ekta Kapoor: नुकताच अमिताभ बच्चन(Amitabh Bachchan), नीना गुप्ता आणि रश्मिका मंदाना यांच्या 'गूडबाय' सिनेमाचा ट्रेलर लॉंच करण्यात आला. सिनेमाच्या ट्रेलरला खूप चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. सिनेमाची कथा कुटुंब आणि त्यातील नात्यांवर आधारित आहे. सिनेमाची निर्माती एकता कपूर आहे. 'गूडबाय' सिनेमाच्या ट्रेलर लॉंचला एकता कपूरनं आपल्या मनातील भीतीला सर्वांसमोर बोलून दाखवलं अन् त्यानंतर मात्र तिला तिचे रडू आवरेना.(Ekta Kapoor cries at goodbye trailer launch as she talks about her biggest fear)

'गुडबाय' सिनेमाच्या ट्रेलरमध्ये दाखवलं गेलं आहे की कसं आईच्या मृत्यूनंतर वडील आणि मुलांमधील नातं वळण घेतं,त्यात कसा बदल होतो. सिनेमात अमिताभ बच्चन आणि रश्मिका मंदाना वडील आणि मुलीच्या भूमिकेत आहेत. ट्रेलरमध्ये या दोघांमधील भांडण आणि वाद पहायला मिळत आहे. एकता कपूरने देखील आपल्या मनात आई-वडीलांना घेऊन मनात भीती आहे असं सांगितलं. आपले आई-वडील आपल्या पासून दूर जातील अशी कायम भिती तिच्या मनात असते.

एकता कपूर म्हणाली,''आपल्याला जन्म देणारे जेव्हा आपला वाढदिवस साजरा करताना आपल्यासोबत नसतात तेव्हा तो आपल्या आयुष्यातला सगळ्यात दुःख देणारा वाढदिवस असतो. आणि तो दिवस प्रत्येकाच्या आयुष्यात येतोच कधीतरी. तो दिवस,ती भीती...मला कळत नाही लोक कसं सहन करतात सगळं. आई-वडीलांशिवाय जगण्याची कल्पना मी करुच शकत नाही. आणि हे बोलताना एकताचा गळा दाटून आला आणि ती रडू लागली''.

एकता कपूर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र आणि शोभा कपूर यांची मुलगी आहे. एकता कपूरला कायम ही भीती सतावते की तिचे आई-वडील आता वयस्कर होत चालले आहेत. आणि तिची हिच भीती तिने 'गूडबाय' ट्रेलर लॉंचच्या दिवशी बोलून दाखवली. एकताला त्यावेळी आपले अश्रू अनावर झाले आणि तिच्या तोंडातून एकही शब्द बोलणं तिला कठीण झालं, शेवटी तिने हातातील माईक इतर कोणाकडे तरी सुपूर्द केला.

'गूडबाय' सिनेमा ७ ऑक्टोबरला रिलीज होत आहे. या सिनेमाच्या माध्यमातून रश्मिका मंदाना बॉलीवूडमध्ये पदार्पण करतेय. याआधी रश्मिका 'पुष्पा' मधून आपल्याला दिसली होती. 'गूडबाय' सिनेमाला विकास बहलने दिग्दर्शित केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

Who Is Jamie Smith? टीम इंडियाची झोप उडवणारा जेमी स्मिथ कोण? ज्याने केलीय १५० धावांची ऐतिहासिक खेळी, मोडले अनेक विक्रम...

२५ वर्षांनी झी मराठीवर दिसणार लोकप्रिय अभिनेत्री, कधीकाळी ठरलेली गाजलेली नायिका; नव्या मालिकेतून करणार कमबॅक

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT