Elli AvRam Esakal
मनोरंजन

Elli AvRam: 'माझे बाब खूप स्ट्रिक्ट...' बोल्ड एलीने सांगितला किस्सा

सकाळ डिजिटल टीम

बिग बॉस फेम आणि डान्सर एली अवराम तिच्या बोल्ड आणि हॉट लूकमुळे चर्चेत आहे. एली अनेकदा तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. प्रत्येक वेळी ती पूर्णपणे वेगळ्या लूकमध्ये आणि स्टाइलमध्ये दिसते. जरी एली इतकी बोल्ड दिसत असली तरी तिच्या घरचं वातावरण हे खूप शिस्तबद्ध होतं. याचा खूलासा तिने Hauterrfly ला दिलेल्या मूलाखतीत केला आहे.

तिने नुकतच एका मूलीखतीत तिच्या पहिल्या क्लबिंग बद्दलचा अनूभव सांगितला. यावेळी ती म्हणाली की ती पहिल्यांदा तिच्या मित्रांसोबत नव्हे तर तिच्या आईसोबत क्लबिंगला गेली होती. जेव्हा तिला विचारण्यात आलं की असं का तर यावर ती म्हणाली की, ती स्वीडिनला असतांना ती आईसोबत क्लबिंग गेली कारण माझे वडिल खुप प्रोटेक्टिव्ह होते. त्याचा त्यांच्या मुलांवर पुर्ण विश्वास होता पण त्यांचा बाकिच्या लोकांवर (या जगावर) विश्वास नव्हता. तिचे वडिल नेहमी म्हणायचे की त्याचा एलीवर पुर्ण विश्वास होता. त्यांना माहित होतं की त्यांनी त्याच्या मूलाचं संगोपण कसं केलयं. कधी कधी तिला याचा खुप राग यायचा पण नंतर तिला कळालं की ते बरोबरचं बोलायचे.

हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

एली अवराम ही स्वीडिश ग्रीक अभिनेत्री आहे. ती आता मुंबईत येऊन स्थायिक झाली आहे. तिने रिअॅलिटी शोपासून चित्रपटांपर्यंत काम केले आहे. यासोबतच तिने अनेक गाण्यांवर आयटम नंबरही केले आहेत.

एलीला तिच्या मिकी व्हायरस या चित्रपटासाठी विषेश ओळखले जाते. या चित्रपटाने चांगला व्यवसाय केला आणि ती पहिल्यांदाच बॉलिवूड चित्रपटात अभिनेत्री म्हणून दिसली. याशिवाय ती बिग बॉसमध्येही सहभागी झाली आहे. बिग बॉसमध्येही ती सलमान खानची फेव्हरेट म्हणून प्रसिद्ध झाली होती.

एलीचा जन्म 29 जुलै 1990 रोजी स्वीडनमध्ये झाला. तिचे वडील ग्रीक आणि आई स्वीडिश आहे. एलीला सुरुवातीपासूनच नृत्य आणि गायनाची आवड होती आणि तिने यातच पुढील करिअर केले. 2010 मध्ये एलीने मिस ग्रीस ब्युटी कॉन्टेस्टमध्येही भाग घेतला होता. त्यानंतर ती २०१२ मध्ये मुंबईत आली. यानंतर तिने बॉलिवूडमध्ये करिअर करण्याचा प्रयत्न केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लावणीची लय, अभिनयाची जादू अन् अजरामर भूमिका; मधू कांबीकर यांची एक्झिट, मराठी कलाविश्वावर शोककळा

VIRAT KOHLI : विराट कोहलीच्या टेस्ट निवृत्तीला अजित आगरकर जबाबदार? ‘ज्या पद्धतीने त्याच्याशी वागला...’ माजी क्रिकेटपटूचं मोठं वक्तव्य

Kolhapur Ambabai Temple : नवरात्रोत्सवाच्या धामधुमीत कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात नवा वाद; देवस्थान समितीविरोधात पुजारी आक्रमक; नेमका वाद काय?

SA vs AUS 1st Test: व्हॉट अ कॅच...! स्टीव्ह स्मिथची चतुराई अन् आफ्रिकन फलंदाजचा करेक्ट कार्यक्रम; ऑसी खेळाडूचा विश्वविक्रम Video

Latest Marathi News Live Update : ज्ञानेश कुमारांविरोधातील आंदोलनासाठी महाराष्ट्रातील काँग्रेसचे १०० नेते दिल्लीत दाखल

SCROLL FOR NEXT