Elon Musk's father Errol Musk, 76, revealed he had a second child with his 35-year-old stepdaughter Jana Bezuidenhout Esakal
मनोरंजन

एलन मस्कच्या ७६ वर्षीय वडीलांचे आपल्याच सावत्र मुलीसोबत शारिरीक संबंध

टेस्ला आणि स्पेसएक्सचे मालक,एलन मस्कचे ७६ वर्षीय वडील एरोल मस्क यांनी एका मुलाखतीत हा धक्कादायक खुलासा केला आहे.

प्रणाली मोरे

टेस्ला आणि स्पेसएक्सचे मालक, एलन मस्कचे(Elon Musk) ७६ वर्षीय वडील एरोल मस्क(Errol Musk) यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. त्यांनी सांगितलं आहे की त्यांचे सावत्र मुलगी जन जाना बेजुइडेनहॉटशी शारिरीक संबंध आहेत आणि तिनं त्यांच्या दोन मुलांना देखील जन्म दिला आहे. जन ही ३५ वर्षांची आहे. तीन वर्षाआधी त्यांच्या सावत्र मुलीनं त्यांच्या दोघांच्या दुसऱ्या सीक्रेट मुलाला जन्म दिला आहे.(Elon Musk's father Errol Musk, 76, revealed he had a second child with his 35-year-old stepdaughter Jana Bezuidenhout)

न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार,एरोल मस्क यांनी एका ब्रिटिश टॅब्लॉइडला दिलेल्या मुलाखतीत हे मान्य केलं आहे की त्यांनी एलोनची सावत्र बहिण जानासोबत शारिरीक संबंध ठेवले होते आणि २०१९ मध्ये जानाने त्या दोघांच्या दुसऱ्या अपत्याला जन्म दिला होता.

एलोन मस्कच्या वडीलांनी पुढे सांगितलं की,''पृथ्वीवर केवळ एकच गोष्ट आहे की जिच्यासाठी आपण पुनरुत्पादन करतो''. एरोल मस्क आणि जाना यांनी २०१७ मध्ये आपल्या पहिल्या अपत्याला जन्म दिला होता. जाना आणि एरोलला पहिला मुलगा झाला आहे. ज्याचे नाव इलियट रश असे आहे.

जाना बेजुइडेनहॉट एरोलची दुसरी पत्नी हाइड बेजुइडेनहॉट हिची मुलगी आहे,जिच्याशी १९७९ साली एलोनची आई मेय हल्दमॅन मस्कपासून विभक्त झाल्यावर एरोल यांनी लग्न केलं होतं. तेव्हा जाना फक्त ४ वर्षांची होती. पण लग्नानंतर काही वर्षांनी एरोल यांनी जानाच्या आईलाही घटस्फोट दिला.

हे आपल्या सगळ्यांना कदाचित माहित असेल की एलन यांनी आपले वडील खूप वाईट माणूस आहेत हे अनेकदा सांगितलं आहे. एलन म्हणाले होते की,''तुम्ही जेवढ्या वाईट गोष्टींचा विचार कराल त्या सगळ्या माझ्या वडीलांनी केल्या आहेत''.

आता एरोल यांच्या मुलीशी असलेल्या शारिरीक संबंधावरील धक्कादायक वक्तव्यामुळे त्यांचं कुटुंब देखील अडचणीत सापडलं आहे. एलनचे वडील एरोल यांनी हे देखील आपल्या त्या खळबळजनक मुलाखतीत सांगितलं की,आता ते जानाच्या आईची आठवणही नावालाच काढतात.

बोललं जातं की, एलन मस्कचे वडील एरोल मस्क आणि जानाची आई यांनी १८ वर्ष संसार केला,त्यांना दोन मुलंही झाली. त्यामुळे असंही बोललं जात आहे की,या घटस्फोटानंतर जर जानाचे एरोलशी संबंध आले तर त्यात मोठं काय. कारण काही वेळासाठी ते दोघे एकत्रही राहले आहेत. एलन मस्कला जेव्हा हे सत्य कळलं तेव्हा त्याला मोठा धक्का बसल्याचं देखील म्हटलं जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिवाळी गिफ्ट काय द्यावं हेसुद्धा कळेना! पंढरपूर विठ्ठल मंदिरातील सुरक्षा कर्मचाऱ्यांना दिला चिकन मसाला, BVG कंपनीचा अजब कारभार

Pune - Nashik हायवेवर 'ट्राफिक जाम'ची दिवाळी! प्रचंड वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा; VIDEO VIRAL

कारखान्याचे कोट्यवधी लाटले, नाचगाणं करणारीला २० कोटींचा स्टुडिओ बांधून दिला; करुणा मुंडेंचा खळबळजनक आरोप

१० वर्षांपासून गायब आहे 'मुन्नाभाई MBBS' मधला अभिनेता; आईला विचारलं मुव्ही बघायला येतेस का आणि...

Latest Marathi News Live Update : मालाडमध्ये अग्नितांडव, १५ ते २० गाळ्यांना लागली आग

SCROLL FOR NEXT