Emraan Hashmi actor OG Antagonist Announcement  esakal
मनोरंजन

Emraan Hashmi : इम्रान हाश्मी आता 'टॉलीवूड' मध्ये!

आता दिग्दर्शक सुजीतचा गँगस्टर ड्रामा ‘ओजी’ ची घोषणा झाल्यापासून तो चर्चेत आहे.

युगंधर ताजणे

Emraan Hashmi actor OG Antagonist Announcement : बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता इम्रान हाश्मीबाबत एक गोड बातमी समोर आली आहे. ती म्हणजे इम्रान हाश्मी हा आता बॉलीवूडच्या नव्हे तर टॉलीवूडच्या एका प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी इम्रान आणि बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार हे एकत्र एका चित्रपटामध्ये दिसले होते.

आता दिग्दर्शक सुजीतचा गँगस्टर ड्रामा ‘ओजी’ ची घोषणा झाल्यापासून तो चर्चेत आहे. बहुप्रतिक्षित आगामी चित्रपटांपैकी एक, ‘OG’ मध्ये पॉवर स्टार पवन कल्याण मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटाचे शूटिंग सध्या प्रगतीपथावर असताना आणि त्यातील काही भाग मुंबईत शूट करण्यात आला आहे.

Also Read - Success Story : अन् त्याने शिक्षणासाठी डोंगरावर मात केली सचिनचा संघर्ष वाचायलाच हवा

निर्माते आता चित्रपटाच्या शूट शेड्यूलला सुरुवात करण्यासाठी हैदराबादला जाणार असल्याचं समजतंय. या चित्रपटाचा एक मोठा अपडेट म्हणून समोर येत असून अभिनेता इमरान हाश्मी या चित्रपटाचा एक भाग होणार असल्याचं सांगितलं जात आहे. इम्रानच्या चाहत्यांसाठी ही एक वेगळी पर्वणी असणार आहे.

तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्याबाबत बोलताना इम्रान हाश्मी सांगतो, "दक्षिण भारतीय चित्रपट इंडस्ट्रीत 'OG' या चित्रपटाद्वारे या नव्या प्रवासाला मी सुरुवात करत आहे आणि त्या साठी मी उत्सुक आहे. चित्रपटाची स्क्रिप्ट प्रभावी आहे. ती मला आव्हानात्मक वाटली म्हणून मी ती स्विकारली.

निर्मात्यांनी अभिनेत्री श्रीया रेड्डी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार असल्याची अधिकृत घोषणा केली आहे. सुजीत यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते प्रकाश राज यांचीही प्रमुख भूमिका साकारणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's Likely Squad For AUS Tour : सूर्यकुमार यादव IN, रोहित, विराटची एन्ट्री; जसप्रीत बुमराह, शुभमन गिल यांना विश्रांती

D-Mart Income: बापरे! डीमार्टची 'ही' फक्त तीन महिन्यांची कमाई… आकडा वाचून थक्क व्हाल

Diwali 2025: यंदा दिवाळी 20 कि 21 ऑक्टोबर? जाणून घ्या 5 दिवसांच्या दिपत्सोवसाची संपूर्ण यादी

Uddhav Thackeray : ठाकरेंच्या शिवसेनेचे कोकण आता नाही राहिलं, एकनाथ शिंदेंनी मोठा गळ टाकला; राजन तेलींचा शिवसेना प्रवेश

Shivkalin Wagh Nakh : कोल्हापुरात शिवकालीन वाघनखे दाखल, उद्‍घाटनासाठी मुख्यमंत्र्यांना वेळ मिळणार का?

SCROLL FOR NEXT