facts about Alia Bhatts character Gangubai Kathiawadi
facts about Alia Bhatts character Gangubai Kathiawadi  
मनोरंजन

आलिया साकारत असलेली 'गंगुबाई काठियावाडी' आहे तरी कोण ?

वृत्तसंस्था

मुंबई : वेगवेगळ्या भूमिकांमध्ये दिसणारी आलिया आता पुन्हा काय हटके घेऊन येते याची प्रतिक्षा नेहमीच तिच्या चाहत्यांना असते. तिने या अपेक्षांची पूर्ती करत आज 'गंगूबाई काठीयावाडी' या चित्रपटाचं पहिलं पोस्टर शेअर केलंय. या चित्रपटाची पहिली झलक लवकरात लवकर यावी अशी तिच्या चाहत्यांची इच्छा होती. गंगुबाईचे हे पोस्टर शेअर केल्यावर आलिया पुन्हा आपल्या अभिनयाची जादू दाखविण्यासाठी सज्ज आहे. आलिया साकारत असलेली गंगूबाई आहे तरी कोण ? जाणून घेऊयात गंगूबाई आणि तिच्या कामाविषयी. 

मुंबईतील संवेदशील अशा कामाठीपुरामधील गंगुबाईच्या जीवनावर आधारित हा चित्रपट असेल. गंगुबाईंना 'मॅडम ऑफ कामाठीपुरा' म्हणून ओळखले जायचे. लेखक एस. हुसेन जैदी यांच्या 'माफिया क्विन्स ऑफ मुंबई' या पुस्तकामध्ये दिलेल्या माहितीनुसार, गंगुबाई ह्या गुजरातच्या काठियावाड परिसरातील रहिवासी त्यामुळे त्यांना गंगुबाई काठियावाड असे म्हटले जात होते. त्यांचे खरे नाव गंगा हरजीवनदास काठियावाड असे होते. लहानपणापासूनच गंगुबाईला अभिनेत्री होण्याचं वेड होतं. पण, ते म्हणतात ना 'सोळावं वरीश धोक्याचं' तसचं काहीसं गंगुबाईसोबत घडलं. वयाच्या 16 व्या वर्षी वडिलांच्या अकाउंटंसोबत तीचं प्रेम जडलं आणि त्याच्यासोबत मुंबईला गंगुबाई पळून आली. 

पण, तिच्यासोबत काही भयानक घडलं. तिच्या पतीनेच तिला चक्क पाचशे रुपयांसाठी कोठ्यावर विकलं. कामाठीपुरात आल्यावर गंगुबाईला प्रचंड संघर्ष करावा लागला. 'क्वीन्स ऑफ माफिया' या पुस्तकामध्ये गंगुबाईविषयी अनेक महत्त्वाच्या आणि धक्कादायक गोष्टी सांगितल्या आहेत. कुख्यात डॉन करीम लालाच्या टोळीने गंगुबाईवर बलात्कार केला होता. 

गंगुबाईने न्याय मिळवण्याचा प्रयत्न केला आणि ती थेट करीम लालाकडे पोहोचली. तिने करीमला राखी बांधून भाऊ बनवले.त्यांच्या मदतीने त्या परिसरात काम करू लागल्या. महिलांना आर्थिक मदत आणि महिलांच्या हक्कांसाठी लढणारी महिला अशी गंगुबाईंची ओळख होती. त्यांना माफिया क्वीन असेही संबोधले जायचे.  करीमची बहिण असल्यामुळे कामाठीपुराचा भाग गंगुबाईकडे आला. असेही म्हणटले जाते की, कोणत्याही मुलीच्या संमतीशिवाय गंगुबाई त्या मुलीला कोठ्यावर घेऊन येत नसे. 

चित्रपटाच्या पोस्टरवरूनच आलिया धुमाकूळ घालणार असं दिसतंय. ती पहिल्यांदाच इतक्या वेगळ्या धाटणीची भूमिका साकारत आहे. लेखक हुसैन जैदी यांच्या 'द माफिया क्वीन ऑफ मुंबई' या पुस्तकावरून या चित्रपटाची कथा घेण्यात आली आहे. आलिया आधी प्रियांकाला या भूमिकेसाठी विचारण्यात आले होते. आलियासोबत कोणता कलाकार या चित्रपटात हे स्पष्ट झालेले नाही. 'गंगुबाई काठीयावाडी' हा चित्रपट 11 सप्टेंबरला रिलीज होईल.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance: विमा घेऊनही चिंता कायम! 43 टक्के पॉलिसी धारकांना मिळत नाही क्लेम; धक्कादायक अहवाल समोर

Water Crisis: देशासमोर पाण्याचे संकट, 150 प्रमुख जलाशयांमधील पाण्याची पातळी घसरली

लग्न झालेलं असो किंवा नसो, स्वेच्छेने ठेवलेल्या लैंगिक संबंधांना चुकीचं म्हणता येणार नाही- हायकोर्ट

Panchayat 3 Release Date Out: प्रतीक्षा संपली! 'पंचायत-3' ची रिलीज डेट जाहीर, 'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार सीरिज

Latest Marathi News Live Update : दिल्लीच्या रस्त्यावर थरार, पोलीस गुंडांमध्ये चकमक

SCROLL FOR NEXT