Faisal Khan Latest News Faisal Khan Latest News
मनोरंजन

Faisal Khan : सुशांत सिंह राजपूतची हत्याच; सत्य लवकर बाहेर यावे

ग्रुपमध्ये नसलेल्यांना समस्यांचा सामना करावा लागतो

सकाळ डिजिटल टीम

Faisal Khan Latest News आमिर खानचा भाऊ फैसल खान एका मुलाखतीमुळे चर्चेत आहे. ‘सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) मृत्यूला खून मानतो. सुशांतच्या मृत्यूच्या तपासात अनेक त्रुटी आहेत. सत्य लवकर बाहेर यावे, अशी प्रार्थना करतो’ असे फैजल खान (Faisal Khan) म्हणाला. फैजलने बॉयकॉटचे समर्थन केले. चित्रपटसृष्टीचा खरा चेहरा समोर आला आहे. जो प्रेक्षकांना पचवता येत नाही, असेही फैजल खान म्हणाला.

‘सुशांत सिंह राजपूतची हत्या झाली याचा मला विषय आहे. हे सत्य कधी उघडेल, काय उघडेल माहीत नाही. एजन्सी गुंतलेल्या असतात पण कधी कधी सत्य बाहेर येत नाही. सत्य बाहेर यावे अशी प्रार्थना करतो. सत्य सर्वांना कळू द्या’ असेही फैजल खान म्हणाला.

फैजलने नेपोटिझमवरही भाष्य केले. यात भ्रष्टाचार, घराणेशाही आहे. नेपोटिझममधून चित्रपट मिळेल. परंतु, तुम्हाला काम माहीत नसेल तर टिकू शकणार नाही. गटबाजीही मोठ्या प्रमाणात आहे. ग्रुपमध्ये नसलेल्यांना समस्यांचा सामना करावा लागतो, असेही फैजल खान (Faisal Khan) म्हणाला.

सुशांत सिंग राजपूतच्या (Sushant Singh Rajput) मृत्यूमध्ये नक्कीच काहीतरी गूढ आहे. चौकशीत अनेक त्रुटी आहेत. सुशांत मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असता तर तो एवढी चांगली कामगिरी कशी करू शकला. लोक काहीही बोलत आहेत. हे गूढही कधी ना कधी उकलणारच. त्याच्या निधनाने इंडस्ट्रीची अनेक गुपिते उघडली आहेत जी लोकांच्या पचनी पडत नाहीत. ड्रग्ज प्रकरणात अनेकांची नावे आल्याने प्रतिमा खराब झाल्याचे फैजल खानने सांगितले.

बॉलिवूडच्या बहिष्काराचे समर्थन

मी बॉलिवूडच्या बहिष्काराचे समर्थन करतो. सामर्थ्यवान माणूस इतर कोणालाही उठू देत नाही. नवा माणूस मोठा होतो. सुशांत होतो. त्याचा खून होतो. खून कोणी केला हे मला माहीत नाही. परंतु, ही एक रहस्यमय गोष्ट असल्याचे सांगितले गेले. सुशांतचे काम चांगले होते. परंतु, त्याचा आत्मविश्वास तोडण्यासाठी अपमान केला गेला. एक वेळ अशी येईल की इंडस्ट्री संपेल, असे फैजल खान म्हणाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sidharth Malhotra's Father Passes Away : सिद्धार्थ मल्होत्राच्या वडिलांचे निधन!, भावूक होत केली पोस्ट अन् म्हणाला...

Bhigwan Crime : आई अन् भावाच्या डोळ्यांत मिरची पूड टाकून तरुणीचे दोघांकडून अपहरण

Car Accident : भरधाव मोटारीच्या धडकेत बालकाचा मृत्यू; तिघे जण गंभीर जखमी

Pune Traffic: गुरुवारी पुणे शहरातील वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद? कोणते रस्ते सुरु? वाचा सविस्तर

पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी एका पदासाठी १० उमेदवार! सोलापूर शहर-ग्रामीण पोलिसांच्या १६९ पदांसाठी ३१६६ जण ‘मैदानी’त पास, वाचा...

SCROLL FOR NEXT