Faizan Ansari Tv entertainment Rakhi sawant press  esakal
मनोरंजन

Jay Bhanushali : 'तू तो व्हिडिओ दहा दिवसांच्या आत डिलीट कर नाहीतर...'! जयवर एवढं कोण भडकलं, काय आहे कारण?

सध्या जय भानुशालीचा तो व्हिडिओ सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

युगंधर ताजणे

Faizan Ansari Tv entertainment Rakhi sawant press : टीव्ही मनोरंजन आणि चित्रपट विश्वातील प्रसिद्ध सेलिब्रेटी जय भानुशाली हा त्याच्या एका व्हिडिओमुळे चर्चेत आला आहे. तो व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर त्याचा मित्र फैजल अन्सारीनं मात्र त्याच्यावर नाराजी व्यक्त केल्याचे दिसून आले आहे. (लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर... फॉलो करण्यासाठी या लिंकवर करा क्लिक)

सध्या जय भानुशालीचा तो व्हिडिओ सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. फैजान आणि राखी यांनी एकत्रितपणे पत्रकार परिषद घेतली होती. त्यात फैजान बोलताना अचानक रडू लागला. यानंतर उपस्थितांना मोठा धक्काच बसला. तो व्हिडिओ पाहिल्यानंतर जयला हसू आवरेना. त्यानं तो व्हिडिओ सोशल मीडियावर शेयर केला आहे. त्यावर नेटकऱ्यांनी देखील वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Also Read - Male Andropause: काय सांगता पुरुषांनाही येते रजोनिवृत्ती?

हे सगळं मात्र फैजानला आवडलेलं नाही. त्यानं जयला तो व्हिडिओ डिलीट करायला सांगितले नाही. नाहीतर त्याच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल करु असाही इशारा दिला आहे. त्यामुळे जयच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. फैजाननं म्हटले आहे की, जयनं तो व्हिडिओ शेयर करायला नको होता. मला ते आवडलेलं नाही.

खरं सांगायचं तर जय भानुशाली हे एवढं मोठं नाव नाही. बॉलीवूडमध्ये त्याची फारशी ओळखही नाही. तो एक अँकर आहे. त्यामुळे केवळ पेज व्ह्युज मिळवण्यासाठी आणि स्वताची लोकप्रियता वाढविण्यासाठी त्यानं तो व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यानं तो व्हिडिओ दहा दिवसांच्या आत डिलीट करावा. असे फैजाननं म्हटले आहे.

जय भानुशालीचा तो व्हिडिओ २१ सप्टेंबरचा आहे. त्यानं तो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्यात फैजान असान्सारीनं प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे बाकीच्या नेटकऱ्यांनी देखील आश्चर्य व्यक्त केले आहे. ती पोस्ट करताना जय ने कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, मित्रा मी तर हार मानली आहे. राखीची प्रतिक्रिया मला आवडली. तिलाही मोठा धक्काच बसला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा Ee Sala Cup Namde! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फायनलमध्ये दिमाखात प्रवेश; गुजरात टायटन्सचा लाजीरवाणा पराभव

BJP Government: भाजप सरकार देणार पाच रुपयांमध्ये मासे-भात भोजन; महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेची घोषणा

Sholay Style Agitation : पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइलने आंदोलन; जलजीवन योजनेचे पाणी घरापर्यंत पोहोचत नसल्याने केला निषेध

Ambad Rajasthani Women: अंबडमध्ये राजस्थानी महिला मंडळाचा ‘धोंडा रो आगमन’ सोहळा; दीडशे लेकींचा पारंपरिक धोंडे जेवण, आहेर व भेटवस्तूंनी सन्मान

Sakoli Murder Case: गडकुंभली तलाव हत्याकांड उघड: निखिल कांबळे खूनप्रकरणी आरोपी जेरबंद, तलावातून धारदार चाकू व दगड जप्त

SCROLL FOR NEXT