मनोरंजन

प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना सितारा देवींवर 'बायोपिक'

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - आपल्या कथ्थक नृत्यानं केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील दर्शकांना थक्क करणाऱ्या सितारा देवी यांच्यावर बायोपिकची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यांच्या 101 जयंतीच्या औचित्यानं या बायोपिकची निर्मिती केली जाणार आहे. या चित्रपटाची निर्मिती राज आनंद मुव्हिजच्या वतीनं केली जाणार आहे. सितारादेवी यांचे पुत्र आणि संगीतकार रंजीत बरोट यांनी ही माहिती सोशल मीडियावरुन प्रसिद्ध केली आहे. यावेळी बरोट आपल्या आईवर तयार होणाऱ्या या बायोपिकला सर्वोतोपरी मदत करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती देताना रंजीत बरोट यांनी सांगितलं की, आमच्या सर्व परिवाराला खूप आनंद झाला आहे. जेव्हा आम्ही ही गोष्ट ऐकली. खरं तर गेल्या अनेक वर्षांपासूनची इच्छा होती ती आता प्रत्यक्षात होणार आहे. आतापर्यत कित्येकदा हा चित्रपट व्हावा यासाठी प्रयत्न करण्यात आले होते मात्र ते पूर्णत्वाला गेले नाही. त्यामुळे यंदाच्या प्रोजेक्टमधून एक नवी कलाकृती आपल्या समोर येणार असल्याचे रंजीत यांनी सांगितलं आहे. जेव्हा राज आनंद हे सितारादेवी यांच्या आयुष्यावर चित्रपट तयार करणार अशी कल्पना घेऊन माझ्याकडे आले तेव्हा मी त्यांना तात्काळ होकार दिला. त्यांना या चित्रपटासाठी सर्वोतोपरी मदत आपण करणार आहोत. जेणेकरुन प्रेक्षकांना सितारादेवी यांच्या आयुष्याचा पट समग्रतेनं कळण्यास मदत होईल.

सितारादेवी यांच्या आयुष्यातील असे काही पैलू आहेत ज्यावर अद्याप कुणीही प्रकाशझोत टाकलेला नाही. या चित्रपटाच्या माध्यमातून तो प्रयत्न आम्ही करणार आहोत. प्रेक्षकांनाही या चित्रपटाची मोठी उत्सुकता आहे. सितारा देवी यांच्यावर प्रेम करणारा प्रेक्षकवर्ग मोठा आहे. केवळ भारतातच नाही तर जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये तो पसरलेला आहे. 1920 साली कलकत्त्या मध्ये सितारादेवी यांचा जन्म झाला. तर 25 नोव्हेंबर 2014 मध्ये त्यांनी मुंबईतल्या एका रुग्णालयामध्ये अखेरचा श्वास घेतला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PN Patil Death: झुंज अपयशी! करवीरचे आमदार पी.एन पाटील यांचे निधन

फॉर्म 17C नुसार मतदानाची आकडेवारी जाहीर केल्यास मतदारांमध्ये गोंधळ निर्माण होईल; ECI चे सुप्रीम कोर्टात शपथपत्र

Shah Rukh Khan Health Update: आता कशी आहे शाहरुखची तब्येत? जुही चावलानं दिली हेल्थ अपडेट

Buddha Purnima 2024: बुद्ध पौर्णिमेला द्या अशा हटके शुभेच्छा, पहा एकापेक्षा एक भारी मेसेज

आजचे राशिभविष्य - 23 मे 2024

SCROLL FOR NEXT