lucky ali news
lucky ali news 
मनोरंजन

'कोणे एकेकाळी तो काय होता, आता काय झाला'

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - प्रसिध्दीच्या शिखरावर असताना सगळेजण कौतूकास्पदच बोलत असतात. चांगल्या काळात नकोशा झालेल्या माणसांचा ससेमिरा काही चुकत नाही. दुसरीकडे वाईट काळात आपली माणसे परकी केव्हा होतात हे कळत नाही. कोणे एकेकाळी त्या गायकाच्या आवाजाने तरुणाईला वेड लावलं होतं. त्याची गायकी प्रस्थापित गायकांपेक्षा वेगळ्या अंगाची होती. ती तरुणाईला कमालीची भावली, आवडली. त्यामुळे त्यांना तो गायक आपला वाटू लागला होता.

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रख्यात अभिनेते मेहमूद यांचा मुलगा म्हणून केवळ लकी अलीची ओळख नाही. त्याने स्वतच्या हिंमतीवर आपली वेगळी ओळख निर्माण केली. संघर्ष, अथक परिश्रमाच्या जोरावर त्याने आपला खास चाहतावर्ग तयार केला.

बॉलीवूडमध्ये अजूनही असा एक वर्ग आहे जो लकी अलीची गाणी आवडीने ऐकतो. सध्याच्या काळातील तरुण पिढीही त्याची गाणी मनापासून ऐकते. अशा लकी अलीला आता परिस्थितीच्या वेगळ्या वळणाला सामोरे जावे लागत आहे.

गेल्या काही वर्षांपासून लकी अली हा अज्ञातवासात असल्यासारखा होता. कधी तो शेती करताना दिसला तर कधी एका खोलीत स्वतला बंद करुन गात होता. अशावेळीही त्याने आपल्यातील गायक मरु दिला नाही. तो गात आहे. सोशल मीडियाच्या मदतीने सध्याच्या काळाशी जोडला गेला आहे.

लकी अलीच्या ओ सनम' गाण्याचा व्हिडीओ होतोय व्हायरल झाला आहे. त्याला त्याच्या चाहत्यांकडून वाहवा मिळाली आहे. लकी अलीचा जो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे, त्यात तो 'ओ सनम' गाणं गाताना दिसतो तसेच सोबत गिटार वाजवत आहे. 

एका हिंदी वृत्तवाहिनीने तो व्हिडीओ त्याच्याच एका कार्यक्रमातील असल्याचे म्हटले आहे. लकी अली सध्या बॉलीवूडपासून लांब आहे.  गीतकार आणि संगीतकार म्हणून काम करणा-या लकी अलीने सुरुवात 'दुश्मन दुनिया का' या चित्रपटाच्या गाण्याने केली.

हृतिक रोशनच्या ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटातील गाण्यांनी लकी अलीला स्टार बनवले. ‘ए पल का जीना’ आणि ‘क्यो होता है प्यार’ ही दोन गाणी लकीने गायली होती. 'ना तुम जानो ना हम', 'आ भी जा', 'हैरात' आणि 'सफरनामा'  ही त्याची हिट गाणी आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT