Alia & Ranbir wedding Instagram
मनोरंजन

आलियाच्या वेडिंग ड्रेसशी कंगनाचं कनेक्शन! वाचा सविस्तर

आलिया भट्टच्या वेडिंग ड्रेसवरुन सोशल मीडियावर भलतीच चर्चा रंगलेली दिसून येत आहे.

प्रणाली मोरे

आलिया(Alia Bhatt)-रणबीर १४ एप्रिल २०२२ रोजी विवाहबद्ध झाले. लग्नात आलिया-रणबीर दोघेही एकमेकांना शोभून दिसत होते. त्यांच्या वेडिंग ड्रेसचीही सर्वात अधिक चर्चा रंगलेली पाहिली. व्हाइट-गोल्डन रंगाचं कॉम्बिनेशन झक्कास दिसत होतं दोघांवरही. लग्नात नेहमीच खूप कलरफुल वेडिंग ड्रेस घालण्याला नवी नवरी प्राधान्य देते. पण आलियानं मात्र पाहताच डोळ्यांना शांत,शीतल अनुभव देणाऱ्या व्हाइट-गोल्डन रंगांची निवड स्वतःसाठी अगदी अचूक केलेली दिसून आली. तसेही ते दोन्ही रंग तिच्या व्यक्तीमत्त्वाचे जणू प्रतिक वाटत होते. सगळ्यांनीच आलिया-रणबीरच्या वेडिंग ड्रेसच्या अशा आगळ्या-वेगळ्या निवडीची प्रशंसा केली. पण तरीही कुठूनतरी कोणा चाहत्यानं आलियाच्या वेडिंग ड्रेसची तुलना कंगनाशी(Kangana Ranaut) केलीच. आता ती कशी ते सविस्तर वाचा.

Kangana Ranaut and Alia Bhatt in similar Sabyasachi dresses.

आता आपल्या सगळ्यांनाच माहित आहे,कंगना आणि आलियात 'गंगूबाई काठियावाडी' सिनेमाच्या प्रदर्शनानंतर शाब्दिक शीतयुद्ध झालं होतं. आता पहिलं शाब्दिक अस्त्र कंगनानंच नेहमीप्रमाणे उचललेलं. तिला कोणीही काहीही न विचारता ती स्वतःचं मत नोंदवून समोरच्याला उगाचच बोचरायचा प्रयत्न करतेच. तसंच,तिनं आलियालाही अनेकदा सुनावलं आहेच. पण आलियानंही अगदी शांत राहून तिला बरोबर पलटवार केलाय. आता कंगनाचा आणि आलियाच्या लग्नाचा तसा काहीच संबंध नसाताना चाहत्यांनी मात्र उगाचच आलियाच्या वेडिंग ड्रेसशी कंगनाचं कनेक्शन लावलंय. म्हणे,आलियाच्या वेडिंग ड्रेससारखीच साडी कंगनानं तिच्या भावाच्या लग्नात घातली होती. कंगनाच्या भावाचं लग्न २०२० साली हिमाचलमध्ये पार पडलं होतं.

खरंतर,आलियाचा वेडिंग ड्रेस आणि कंगनाची भावाच्या लग्नातली साडी हे डिझायनर सब्यासाचीनंच डिझाईन केलेले पेहराव. आणि नेमकं नेटकऱ्यांनी हे हेरलं, आणि मग काय बिचाऱ्या आलियाच्या लग्नाच्या फोटोंवर या कारणामुळे प्रतिक्रिया नोंदवायला सुरुवात केली. एकानं कंगनाचा भाऊ अक्षतच्या लग्नामधील तिचा फोटो पोस्ट करत कमेंट बॉक्समध्ये लिहिलंय,'आलियानं जसा वेडिंग ड्रेस घातलाय तशीच साडी याआधीच कंगनानं तिच्या भावाच्या लग्नात खूपआधी घातली होती'. तर दुसऱ्या एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे,'त्यांचे आऊटफिट्स एकच नाहीत,पण एकसारखे आहेत..हाहाहाहा...' तर एकानं लिहिलंय,'आलियाच्या वेडिंग ड्रेसवर फुलपाखरं आहेत आणि कंगनाच्या साडीवर फुलं...' तर एकानं चक्क लिहून टाकलं,'म्हणजे आलियानं तिच्या वेडिंग ड्रेसची प्रेरणा कंगनाकडून घेतली होती'.

आता या अशा प्रतिक्रिया वाचून आलिया नक्कीच खट्टू होणार बिचारी. कारण तसं पाहिलं तर कंगना नेहमीच आलियाच्या कामावर उगाचच टीका करण्याचा प्रयत्न करीत असते. नेपोटिझम हे तर अस्त्रच मिळालंय कंगनाला. यावरनं तर कंगनानं आलियाला खूप काही सुनावलं होतं. करण जोहरची 'कटपुतली बाहुली' देखील कंगनानं आलियाला म्हटलं होतं. 'गंगूबाई'च्या वेळेला तर कंगना आलियाला म्हणाली होती, ''वडिलांची राजकुमारी'',''रोम-कोम बिम्बो...'' आणि काहीबाही बरंचं बरळली होती. 'गंगूबाई'चं कास्टिंगचं चुकीचं होतं असं देखील कंगना त्यावेळी म्हणाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhanorkar Join BJP: रविंद्र चव्हाणांचा विराट शो! धानोरकरांचा भाजपात प्रवेश, काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंचा किल्ला कोसळला

मोदी सरकारचा मोठा निर्णय! Asia Cup 2025 स्पर्धेतील India vs Pakistan लढत होणार की नाही? फैसला झाला

तिला स्मशानात जळायचं नव्हतं... आईच्या गूढ मृत्यूबद्दल पहिल्यांदाच बोलली पूजा बेदी; म्हणाली, 'ती अचानक गायब झाली...

Stock Market Closing: शेअर बाजार वाढीसह बंद; सलग सहाव्या दिवशी तेजी, कोणते शेअर्स चमकले?

Bail Pola 2025: डिजेपासून बैलांना त्रास! शेतकऱ्यांना ‘ॲनिमल राहत’कडून १० सूचना

SCROLL FOR NEXT