मनोरंजन

'ट्रेनमधून पडलो कुणी काम देईना', अग्निपथमधल्या अभिनेत्याची खंत

युगंधर ताजणे

मुंबई - एकीकडे कोरोनामुळे (corona) मनोरंजन (entertainment) क्षेत्रावर संकट आहे. त्याचा मोठा फटका अनेक कलाकारांना बसला आहे. कित्येक सेलिब्रेटींना कामं मिळेनाशी झाली आहेत. यापूर्वी सोशल मीडियावर कित्येक ज्येष्ठ कलाकारांनी आपल्याला काम मिळत नसल्यानं मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत असल्याचे दिसून आले आहे. आताही बॉलीवूडमधल्या एका ज्येष्ठ अभिनेत्याची पोस्ट व्हायरल झाली आहे. त्यानं आपल्याला एक अपघात झाला होता. त्यावेळी त्यात चेहऱ्याला झालेल्या दुखापतीमुळे आपल्याला बॉलीवूडमध्ये कुणीही काम देईनासे झाले. अशी खंत व्यक्त केली आहे. विशेष बाब म्हणजे त्या अभिनेत्यानं बॉलीवू़डमधील (bollywood) मोठमोठ्या कलाकारांसोबत काम केले आहे. वेळ आल्यावर कुणीही मदतीला धावून येत नाही. या शब्दांत त्यानं आपली वेदना मांडली आहे.

अग्निपथमध्ये काम केलेल्या रेशम अरोरा (resham arora) या अभिनेत्याला सध्या मोठ्या कठीण प्रसंगातून जावं लागत आहे. ते आर्थिक परिस्थितीशी झगडताना दिसत आहे. ते 71 वर्षांचे आहेत. मात्र त्यांच्याजवळ कोणतेही काम नाही. त्यांना काम द्यायला कुणीही तयार नाही. त्यांनी एका मुलाखतीतून आपल्याला सध्या ज्या परिस्थितीतून जावे लागत आहे, त्याविषयी सांगितलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, जेव्हापासून कोरोना आला तेव्हाच आमच्यावर गंभीर संकट येणार याची चाहूल लागली होती. अशावेळी कोण मदतीला येणार हेही माहिती होतं. बॉलीवूड़मधल्या मोठमोठ्या सेलिब्रेटींसोबत काम केलेल्या एखाद्या ज्येष्ठ कलाकारावर जेव्हा अशी वेळ येते तेव्हा खरचं गांभीर्यानं विचार करण्याची वेळ आली आहे. असे जाणवते.

मला अजूनपर्यत कोणतचं काम मिळालेलं नाही. जेव्हापासून कोरोना आला आहे तेव्हापासून मी घरीच आहे. एका रेल्वे अपघातात मला मोठी इजा झाली. त्यात माझ्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली होती. एक वेळ अशी आली की, मला कुणी ओळखेना. मी त्यांना माझी ओळख सांगितली तर ती मस्करी करतोय असे वाटे. ही वेळ फार वाईट होती. अशीही खंत अरोरा यांनी व्यक्त केली. अश्विनी धीरच्या सेटवर मला एका कीटकानं दंश केला. त्याचाही माझ्या प्रकृतीवर परिणाम झाला. तेव्हापासून माझं फिरण बंद झालं. आणि माझा अवघड काळ सुरु झाला. अजूनही मला कामाची मोठी गरज आहे. त्यांनी कामासाठी बॉलीवूडला आवाहन केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: भाजप -एनडीए 2-0 ने आघाडीवर; कोल्हापुरात पीएम मोदांचा विरोधकांवर हल्लाबोल

Ujjwal Nikam: "माझा जन्म हनुमान जयंतीचा", 'मविआ' उमेदवाराला कसं रोखणार या प्रश्नावर निकमांचा थेट युक्तिवाद

Ujjwal Nikam: उज्ज्वल निकम यांना भाजपकडून मुंबई उत्तर-मध्यमधून उमेदवारी जाहीर; पुनम महाजन यांचा पत्ता कट

IPL 2024 DC vs MI Live Score : मुंबईला तगडा झटका! खलीलने आक्रमक खेळणाऱ्या सूर्यकुमारचा अडथळा केला दूर

Pune News : पुण्याचे माजी महापौर मोहनसिंग राजपाल यांचे दीर्घ आजाराने निधन

SCROLL FOR NEXT