Female Tara Singh is Seema Haider…’ Gadar 2 director anil sharma said about the woman who fled from Pakistan  SAKAL
मनोरंजन

Gadar 2 Seema Haider: प्रेमासाठी पाकीस्तानातून भारतात आली सीमा हैदर, गदर 2 चे दिग्दर्शक म्हणतात...

गदर 2 मध्ये घडणारी अशीच गोष्ट खऱ्या आयुष्यात घडलीय

Devendra Jadhav

Anil Sharma On Seema Haider News: सध्या गदर 2 सिनेमाची सगळीकडे चर्चा आहे. अनिल शर्मा दिग्दर्शित गदर 2 सिनेमा ११ ऑगस्टला रिलीज होतोय. गदर सिनेमात आपण पाहीलं की तारा सिंग सकीनासाठी भारत सोडून पाकीस्तानात जातो.

गदर मध्ये घडणारी अशीच गोष्ट खऱ्या आयुष्यात घडलीय. आपल्या प्रियकरासाठी एक तरुणी पाकीस्तानातून भारतात आल्याची गोष्ट घडलीय. ही गोष्ट जेव्हा गदर 2 चे दिग्दर्शक अनिल शर्मांना समजली तेव्हा ते काय म्हणाले पाहूयात...

(Female Tara Singh is Seema Haider…’ Gadar 2 director anil sharma said about the woman who fled from Pakistan)

पाकिस्तान सोडून भारतात आलेल्या सीमा हैदर या आपल्या प्रेमासाठी सध्या चर्चेचा भाग बनल्या आहेत. प्रेमापोटी सीमाने आपले राहते घर, राहता देश सोडला.. सीमाची कथा चित्रपटापेक्षा कमी नाही. "सीमाची गोष्ट मला गदरची आठवण करून देते.

तारा सिंह पत्नी आणि मुलासाठी पाकिस्तानात कसे गेले. सीमाला गदरचा तारा सिंग मानतो, असं गदरचे दिग्दर्शक अनिल शर्मा सीमाबद्दल बोलतात.

Aaj Tak ला दिलेल्या मुलाखतीत अनिल शर्मा यांनी सीमा हैदर आणि गदर यांच्याबद्दल विचारण्यात आले. त्यांनी सीमाचे कौतुक करत ती खूप धाडसी असल्याचे सांगितले.

आपल्या प्रेमाला भेटण्यासाठी ती भारतात आली होती. तिथेच भारतातल्या मुलाने सीमाला मुलांसह स्वीकारले. प्रेमासाठी ती एवढी लांब आली आहे, तिचे इथे स्वागतच व्हायला हवे.

अनिल शर्मा यांनी सीमाला लेडी तारा सिंह म्हटले. अनिल शर्मा म्हणतात- मी त्या मुलीला तारा सिंगची महिला आवृत्ती म्हणेन. तिची हिंमत इतकी होती की ती कोणाचीही पर्वा न करता इथे आली. हे सोपे नाही.

चित्रपट पाहिल्यानंतर कदाचित तो फक्त प्रेमात पडला नसेल, तर चित्रपट पाहिल्यानंतर त्याला तारा सिंग यांच्याकडून हिंमत मिळाली असावी. ते करू शकतात तर मी का नाही करू शकत. असं तिला वाटेल.

कोण आहे सीमा हैदर?

सीमा हैदर तिच्या चार मुलांसह भारतात आली होती. सीमा आणि सचिन 2019 मध्ये ऑनलाइन गेम PubG च्या माध्यमातून भेटले होते. दोघांमध्ये आधी मैत्री आणि नंतर प्रेम झाले.

या वर्षी मार्चमध्ये दोघे नेपाळमध्ये भेटले होते आणि तिथेच लग्न केले होते. त्यानंतर ती पुन्हा पाकिस्तानात परतली. आता सीमा 13 मे रोजी पाकिस्तानातुन नेपाळमार्गे पुन्हा भारतात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Badlapur MIDC Explosion: बदलापूर 'MIDC' हादरली! केमिकल कंपनीत तासभरातच एकामागोमाग पाच ते सहा भीषण स्फोट

Nitish Kumar Hijab Controversy: नितीश कुमारांच्या ‘हिजाब’ प्रकरणातील 'ती' डॉक्टर तरूणी अखेर सरकारी नोकरीत झाली रुजू

Shakun Shastra : डोळे फडफडणे, तळहात खाजवणे, अंग थरथरणे शुभ की अशुभ? शकुन शास्त्रातील रहस्य काय सांगते पाहा..

Akola Political : अखेर ‘अकोट विकास मंचा’तून ‘एआयएमआयएम’ बाहेर; अकोटमध्ये सत्तेचा नवा खेळ सुरू!

Latest Marathi News Update: देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी, एकाच क्लिकवर

SCROLL FOR NEXT