Fighter OTT Released Date
Fighter OTT Released Date esakal
मनोरंजन

Fighter OTT Released Date : हृतिकच्या फायटरची 'ओटीटी रिलिज डेट' जाहीर, 'या' दिवशी होणार प्रदर्शित

युगंधर ताजणे

Fighter OTT Released Date : प्रख्यात दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदच्या फायटर सिनेमाला बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाल्याचे दिसून आले. त्यानं दोनशे कोटींपेक्षा जास्त (Fighter Movie On OTT) कमाई करुन प्रेक्षकांचे मनोरंजन केले. या चित्रपटातून दीपिका आणि हृतिक हे पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेयर केली होती.

फायटरच्या बाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित (Fighter Latest News) होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. एनडीटीव्हीनं याबाबत वृत्त दिलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासुन प्रेक्षक फायटर ओटीटीवर केव्हा प्रदर्शित होणार याकडे लक्ष ठेवून होते. अखेर मेकर्सनं त्याची ओटीटी रिलीज डेट जाहीर केली आहे.

हृतिक रोशन, दीपिका पदुकोण आणि अनिल कपूर यांची फिल्म फायटर लोकप्रिय झाल्याचे (Hrithik Deepika Movie) दिसून आले. जगभरातून या चित्रपटानं तीनशे कोटींपेक्षा जास्त कमाई केल्याचे सांगण्यात येत आहे. हा चित्रपट येत्या २१ मार्च रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार असल्याची माहिती आहे. याची कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फायटरचे राईट्स मोठ्या किंमतीला नेटफ्लिक्सला विकले गेल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

फायटरच्या कलेक्शनविषयी बोलायचे झाल्यास या चित्रपटानं पहिल्याच दिवशी ४० कोटींची कमाई केली होती. त्यानंतर फायटरनं चाहत्यांना जिंकून घेतल्याचे दिसून आले. भारतामध्ये या चित्रपटानं दोनशे कोटींपेक्षा कमाई करत जगभरातून तीनशे कोटींचा आकडा पार केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मतदानात महाराष्ट्र तळाला, आतापर्यंत झालेल्या मतदानात 'हा' मतदारसंघ आघाडीवर

Navi Mumbai News: 13 वर्षाच्या मुलाने पॉर्न पाहून अल्पवयीन बहिणीला केलं गरोदर, पनवेलमधील धक्कादायक घटना

Latest Marathi Live News Update: नवी मुंबई पोलीस आयुक्तांकडून मतदान केंद्रांच्या सुरक्षेचा आढावा

T20 WC 2024 पूर्वी संघाने बदलला कर्णधार; 'या' स्टार खेळाडूकडे दिली टीमची कमांड

Kalyan Loksabha: प्रशासनाचा भोंगळ कारभार, मतदार यादीत नाव नसल्याने मतदार हैराण

SCROLL FOR NEXT