Mahesh Bhatt
Mahesh Bhatt Esakal
मनोरंजन

Mahesh Bhatt: ज्येष्ठ चित्रपट निर्माते महेश भट्ट यांच्यावर हृदय शस्त्रक्रिया, मात्र आता प्रकृती...

Vaishali Patil

प्रसिद्ध भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथा लेखक महेश भट्ट यांच्या प्रकृतीबाबात एक मोठी बातमी समोर आली आहे. महेश भट्ट यांच्यावर नुकतीच हृदयाची शस्त्रक्रिया झाली आहे. त्यामुळे महेश भट्ट यांच्या प्रकृतीबाबत भट्ट कुटुंब चिंतेत आहे.

आलिया भट्टचे वडील महेश भट्ट यांच्यावर हृदयाची शस्त्रक्रिया झाल्याचं वृत्त आहे. महेश भट्ट यांची अँजिओप्लास्टी झाली आहे. गेल्या महिन्यात त्यांच्या हृदयाची तपासणी झाल्यानंतर लवकरच शस्त्रक्रियेची गरज भासू लागली.

'इटाईम्स'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, महेश भट्ट यांचा मुलगा राहुल याने या बातमीची पुष्टी केली आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला त्यांच्या वडिलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि त्यांच्या हृदयावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

याविषयी बोलतांना तो म्हणाला, 'ऑल इज वेल दॅट एन्ड वेल. ते (महेश भट्ट) आता ठीक आहे आणि घरी परतले आहे. मी तुम्हाला अधिक तपशील देऊ शकत नाही कारण हॉस्पिटलमध्ये अनेक लोकांना जाण्याची परवानगी नव्हती.'

हेही वाचा: मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

महेश भट्ट यांनी वयाच्या 26 व्या वर्षी 'मंजिलें और भी हैं' या चित्रपटाद्वारे त्यांनी दिग्दर्शनात पदार्पण केले. 1974 पासून चित्रपटाचे दिग्दर्शिन करण्यास सुरुवात केली. 1984 मधील 'सारांश' हा त्यांचा सर्वात लोकप्रिय चित्रपट होता, जो 14 व्या मॉस्को आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झाला होता.

आज महेश भट्ट यांची गणना बॉलिवूडमधील टॉप फिल्ममेकर्समध्ये केली जाते. त्याचे विशेष फिल्म्स नावाचे स्वतःचे प्रोडक्शन हाऊस देखील आहे. आता आगामी काळात त्याच्या अनेक चित्रपटांवर काम सुरु आहे. त्यामुळे ते लवकरच बरे होऊन पुनरागमन करतील, अशी आशा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Traffic advisory : मुंबईत PM नरेंद्र मोदींची जाहीर सभा; गर्दी टाळण्यासाठी वाहतुकीत मोठे बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Cotton Seeds : पहिल्याच दिवशी कपाशी बियाण्यांचा अत्यल्प पुरवठा; आजपासून कापूस बियाणे विक्रीचा होता मुहूर्त

MS Dhoni: धोनी RCB ला देणार सरप्राईज? CSK ने शेअर केलेल्या त्या व्हिडिओने चर्चांना सुरुवात

Share Market Today: अमेरिकन बाजार विक्रमी उच्चांकावरून कोसळले; भारतीय शेअर बाजारात कशी असेल स्थिती?

Devendra Fadnavis: "सिंचन घोटाळ्याप्रकरणी आरोप चुकीचे नव्हते, तेव्हा..."; देवेंद्र फडणवीसांनी मनातलं बोलून दाखवलं

SCROLL FOR NEXT