ND studio 
मनोरंजन

कर्जतच्या एनडी स्टुडिओत अग्नितांडव; 'जोधा अकबर'चा सेट जळून खाक

हा सेट लोकांना पाहण्यासाठी आणि आठवण म्हणून जतन करून ठेवण्यात आला आहे.

स्वाती वेमूल

खालापूर तालुक्यातील चौक येथे असलेल्या एनडी स्टुडिओला ND Studio भीषण आग लागली. या आगीत 'जोधा अकबर' Jodha Akbar या सिनेमाच्या सेटसह शनिवार वाड्याचा सेटदेखील जळून खाक झाला आहे. कर्जत-पनवेल रेल्वे ट्रॅकच्या जवळच 'जोधा अकबर' चित्रपटाचा सेट उभा आहे. हा सेट लोकांना पाहण्यासाठी आणि आठवण म्हणून जतन करून ठेवण्यात आला आहे. या सेटला अचानकपणे आग लागल्याचे लक्षात आले. हा सेट फायबर आणि लाकूड यांचा असल्याने आगीने लगेचच रौद्र रूप धारण केले. (Fire breaks out at ND studio Karjat Jodhaa Akbar set up in flames)

सेटच्या बाजूलाच फायबर प्रॉपर्टी असून यात अनेक प्रकारच्या कलाकृती होत्या. विविध मंदिरं, मस्जिद, किल्ला, ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले राजवाडे, घरे, रेल्वे स्थानक दिग्दर्शनामध्ये जे वास्तव उभे केले जाते त्या सर्व प्रकारच्या कलाकृती त्यात होत्या. या कलाकृती फायबरच्या असल्याने आग आटोक्यात आणण्यासाठी खोपोली आणि कर्जत नगरपालिका, रिलायन्स यांचे अग्निशमन दल शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

हेही वाचा : रामदेव बाबांच्या 'कोरोनिल'वर टीका करणारा चेतन भगत ट्रोल

आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. पण रेल्वे ट्रॅकवरील गवत आणि इतर साफसफाई करण्यासाठी रेल्वे कर्मचारी आग लावतात, त्यामुळेच ही आग लागल्याची चर्चा होत आहे. अनेक दिवस येथील सिनेमाचे चित्रीकरण बंद आहे. त्यामुळे सुदैवाने जीवितहानी टळली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Doctors Prescription: आता डॉक्टरांना स्पष्ट प्रिस्क्रिप्शन लिहिणे बंधनकारक! एनएमसीचा कठोर आदेश; निर्णयामागचं कारण काय?

IPL 2026: 'बाकी फ्रँचायझी झोपल्या असताना मुंबई इंडियन्सने संधी साधली' R Ashwin ला नेमकं काय म्हणतोय?

Maharashtra Cabinet Reshuffle : राज्य मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चेला वेग; वसमतचे आमदार राजू नवघरे मंत्री होण्याची दाट शक्यता!

Bhimashankar History : ८० वर्षांनंतर भीमाशंकरची सावली पुन्हा; जुन्नर–आंबेगावात नरभक्षक बिबट्यांची दहशत!

Shilpa Shetty Latest News : शिल्पा शेट्टीच्या अडचणी वाढल्या! , आता मुंबईतील घरावरही 'आयकर' विभागाची छापेमारी

SCROLL FOR NEXT