Ashi Singh Meet Set Caught Fire Esakal
मनोरंजन

Meet Set Caught Fire: प्रसिद्ध टीव्ही शो 'मीत'च्या सेटला लागली आग!

Vaishali Patil

Ashi Singh Meet Set Caught Fire: लोकप्रिय टीव्ही शो 'मीत: बदलेगी दुनिया की रीत'शी संबंधित एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. या मालिकेच्या सेटवर आग लागली होती. अचानक लागलेल्या आगीमुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

सेटवरील सर्वच कलाकार सुरक्षित आहेत की नाहित याची चिंता चाहत्यांना लागून होती. आशी सिंह आणि शगुन पांडे या शोमध्ये मुख्य भूमिकेत आहेत. याबाबत अखेर, शोची मुख्य अभिनेत्री आशी सिंहने सेटला आग कशी लागली याची माहिती शेअर केली आहे. मीरा रोड शोच्या सेटवर आग लागली होती. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे आशीने सांगतिले.

मिळालेल्या माहितीनुसार, सेटवरील एका खोलीच्या ए.सी. मध्ये शॉर्ट सर्किट झाले. त्यामुळे सेटला आग लागली.

ज्या खोलीत आग लागील होती ती पूर्णपणे जळून खाक झाली आहे, त्यामुळे तिथे ठेवण्यात आलेले कॅमेरे व इतर उपकरणे वेळीच बाहेर काढण्यात आली.

यात कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. याशिवाय शॉर्ट सर्किटचं नेमकं कारण याचा शोध घेण सुरु आहे. जेणेकरून भविष्यात होणारे अपघात टाळता येतील.

आशीच्या म्हणण्यानुसार, “अभिनेता सुशील सिंगच्या मेकअप रुममध्ये आग लागली. या शोमध्ये सुशील सिंग सरकारची भूमिका साकारत आहे.

अभिनेत्री आशी सिंह हिने याबद्दल माहिती देतांना सांगितले की, 'सेटवरील सर्व लोक ठीक आहेत आग लागली होती, मात्र ती एका खोली पर्यंतच राहीली.

त्या खोलीचा एसी चांगला नव्हता. त्या खोलीत कोणीही नव्हतं त्यामुळे सर्व सुखरुप आहे. सर्वजण सेटवर होते आणि आम्ही शूटिंग पुन्हा सुरू केले . आता सर्व काही चांगले आणि सुरक्षित आहे. काळजी करण्यासारखे काही नाही.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Tourism Latest Update : गणपतीपुळे बीच अखेर पर्यटकांसाठी खुला! 2 महिन्यांनंतर बंदी उठवली; पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण

थकलेला चेहरा, चालताही येईना... नवऱ्याला अखेरचा निरोप देताना अरुणा इराणी यांना अश्रू अनावर; या कलाकारांचीही हजेरी

Marathi News: मराठी डिजिटल न्यूजमध्ये eSakal पुन्हा नंबर 1; Comscoreच्या ताज्या आकडेवारीत 7.4 कोटींचा टप्पा

Latest Marathi News Live Update : जसप्रीत बुमराहला मागे टाकत मिचेल स्टार्क कसोटी क्रमवारीत अव्वल

Chandgad MD Drugs Case: चंदगड पोलिस, पालकांची जबाबदारी वाढली; हाजगोळी ड्रग्ज प्रकरण; मुलांच्या वर्तणुकीकडे लक्ष ठेवण्याची गरज

SCROLL FOR NEXT