friendship day special nana patekar used to give foot massage to marathi film legend actor ashok saraf sakal
मनोरंजन

Friendship Day 2023: नाना पाटेकर अशोक मामांचे पाय चेपायचे, आजही आहे घट्ट मैत्री

नानांकडे गणपतीसाठीही पैसे नव्हते, अशोक मामांनी थेट कोरा चेक दिला.. वाचा या खास मैत्रीचे किस्से..

नीलेश अडसूळ

friendship day 2023 : अशोक सराफ म्हणजेच अवघ्या मनोरंजन विश्वाचे मामा. नुकतीच मामांची पंच्याहत्तरी झाली. अशोक मामा आणि त्यांचे मित्र म्हंटलं कि डोळ्यापुढे लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर, महेश कोठारे हि मंडळी अगदी सहज समोर येतात. अर्थात त्यांच्यात घट्ट मैत्री आहे आणि त्यांनी अनेक सिनेमे एकत्र केले आहेत. पण अशोक मामांच्या आयुष्यात असा एक मित्र आहे जो खूप जवळचा आहे खास आहे आणि तो मित्र म्हणजे मराठी सह बॉलीवूड मध्ये आपल्या अभिनयाचा दरारा दाखवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर. (friendship day special nana patekar used to give foot massage to marathi film legend actor ashok saraf)

नाना आणि मामा म्हणजेच नाना पाटेकर आणि अशोकसराफ यांच्यातील मैत्री ही शब्दात सामावणारी नाही. कारण रंगभूमीवर पाऊल ठेवल्यापासून एकमेकांच्या पडत्या काळात सोबत पर्यंत ते अगदी सुपरस्टार होईपर्यंत ते कायमच एकमेकांच्या सोबत राहिले आहे. सध्या सर्वत्र मैत्री दिवस म्हणजेच फ्रेंडशिप डेचे वारे वाहू लागले असल्याने या नाना मामांची मैत्री कशी होती ते जाणून घेऊया..

अशोक सराफ आणि नाना पाटेकर यांनी एकमेकांना दिलेली साथ ते अजूनही विसरलेले नाहीत. एका मुलाखतीत अशोक मामा म्हणाले होते की, नानाने माझा जीव वाचवला आहे. तो किस्सा असा होता की, एकदा नाटक रद्द झाल्याने लोक अशोक सराफ यांना मारण्यासाठी माझ्या मागे धावले होते. त्यावेळी नाना पाटेकर मदतीला धावून आले. तेव्हा नानांनी मामांना घेऊन थिएटरच्या मागच्या बाजूने उडी मारुन पळ काढला. पूर्वी हाती ओढणारी रिक्षा असायची, ती रिक्षा थांबवून त्याने स्वतः ओढली आणि मला घेऊन सुरक्षित ठिकाणी पोहोचला. तो होता म्हणून मी वाचलो.' असे अशोक मामा आवर्जून सांगतात.

तर नाना देखील कायम अशोक मामांनी केलेल्या मदतीविषयी बोलत असतात. नाना आणि मामांची मैत्री 'हमीदाबाईची कोठी' या नाटकामुळे अधिक घट्ट झाली. नाना एक किस्सा सांगताना म्हणाले होते, 'हमीदाबाईची कोठी नाटक करताना मला ५० रुपये मिळायचे आणि अशोक सराफला २५० रुपये मिळायचे. त्या पडत्या काळात अशोकने मला पैशांची खूप मदत केली. नाटकाच्या मधल्या वेळात आम्ही पत्ते खेळायचो. त्यावेळी मला पैसे मिळावे म्हणून तो मुद्दामून हरायचा. हे माझ्याही लक्षात यायचं पण तेव्हा मला पैशांची गरज होती. अगदी नाटकानंतर बऱ्याचदा मी अशोकचं डोकं चेपून द्यायचो, पाय चेपायचो आणि त्याचेही तो मला पैसे द्यायचा.'

एकदा गणपतीची आठवण सांगताना नाना म्हणाले, 'एकदा गणपतीला माझ्याकडे पैसे नव्हते. फुलांचा सगळा खर्च कसा करायचा हा प्रश्न होता. सकाळी सहा साडे सहा वाजता अशोक फिल्मसिटीला शुटिंगला चालला होता.माहीमच्या घरी आला, दारावर टकटक केलं, माझ्या हातात एक कोरा चेक दिला आणि म्हणाला.. खात्यात १० हजार आहेत…तुला हवे तेवढे काढ. असं म्हणून तो निघून गेला. मी तीन हजार रुपये काढले होते. काही वर्षानंतर आम्ही एका सिनेमात एकत्र काम करत होतो. त्यावेळी मी त्याला ते दिले,'अशी आठवण नाना पाटेकर यांनी सांगितली होती. त्यांच्यातील मैत्री आजही अशीच घट्ट आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohan Bhagwat: देशाचा आर्थिक विकास पण श्रीमंत-गरीबांमधील दरी वाढत आहे, मोहन भागवातांनी व्यक्त केली चिंता

Gandhi Jayanti 2025: विद्यार्थ्यांनी गांधीजींच्या 'या' ७ शिकवणीतून अवश्य घ्यावे अमूल्य धडे

Dasara 2025 Vastu Tips: दसऱ्याला 'या' वस्तू उधार घेतल्याने होतो वास्तू दोष, जाणून घ्या

'देश मनुस्मृती नव्हे, तर भीम स्मृती म्हणजेच संविधानानुसार चालेल'; वाजपेयींचा उल्लेख करत RSS च्या मेळाव्यात काय म्हणाले माजी राष्ट्रपती?

Dussehra Melava 2025 Live Update : आपल्याला आत्मनिर्भर व्हावं लागेल, स्वदेशी स्वीकारावं लागेल - सरसंघचालक मोहन भागवत

SCROLL FOR NEXT