Fu Bai Fu off-air...zee Marathi comedy show Google
मनोरंजन

Fu Bai Fu: 'फू बाई फू'चा फुस्का डाव! अल्पावधीतच गुंडाळला कार्यक्रम, कारण...

झी मराठीवर एक काळ गाजवलेला फू बाई फू हा कार्यक्रम तब्बल ९ वर्षांनी ३ नोव्हेंबर,२०२२ रोजी पुन्हा नव्यानं आणला होता.

प्रणाली मोरे

Fu Bai Fu: झी मराठीवर काही कार्यक्रम गतकाळात असे होऊन गेलेयत ज्यांच्या विषयी अनेक वर्षानंतरही प्रेक्षकांमध्ये क्रेझ दिसून आली आहे. त्या कार्यक्रमांचे केवळ मराठी नाही तर अमराठी प्रेक्षकही चाहते होते. त्यातलाच एक कार्यक्रम म्हणजे 'फू बाई फू'. एक काळ होता जेव्हा अनेक नवख्या विनोदीवीरांना घेऊन केलेल्या फू बाई फू कार्यक्रमानं वाहिनीवरील अनेक टॉपच्या मालिकांना आव्हान दिलं होतं. टीआरपी च्या स्पर्धेत 'फू बाई फू' नं आपली दहशत निर्माण केली होती असं म्हटलं तर अतिश्योक्ती ठरू नये.

अनेक सिझन या कार्यक्रमानं गाजवले. फू बाई फू च्या जुन्या सिझनमध्ये चमकलेले कलाकार आज स्टार्स आहेत. तब्बल ९ वर्षांनी हा कार्यक्रम पुन्हा वाहिनीनं आणला तेव्हा चाहते भलतेच खूशीत होते. कार्यक्रमाचा मोठा गाजावाजा केला गेला. पण आता बातमी समोर येतेय की कार्यक्रम अर्ध्यावरच गुंडाळला जातोय. काय आहे नेमकं कारण? चला जाणून घेऊया सविस्तर.

ओमकार भोजने, भूषण कडू, सागर कारंडे, नेहा खान, पंढरीनाथ कांबळे,प्राजक्ता हनमकर,कमलाकर सातपुते,माधवी जुवेकर..अशा अनेक विनोदात मुरलेल्या कलाकारांना घेऊन तब्बल ९ वर्षांनी फू बाई फू कार्यक्रम झी मराठीनं आणला,पण अवघ्या महिनाभरात कार्यक्रमाला गुंडाळलं जातंय याची बातमी समोर येतेय. झी मराठीवर नव्यानं येऊ घातलेल्या दोन मालिका आणि फू बाई फू ला म्हणावा तसा मिळत नसलेला प्रतिसाद ही कारणं समोर येत आहेत. या कार्यक्रमाला उमेश कामत आणि निर्मिती सामंत परिक्षक म्हणून लाभल्या होत्या,तर वैदेही परशुरामी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत होती.

फू बाई फू हा कार्यक्रम तब्बल ९ वर्षांनी झी मराठी वाहिनीवर ३ नोव्हेंबर,२०२२ रोजी सुरू झाला होता. पण बोललं जात आहे की ८ डिसेंबर,२०२२ रोजी कार्यक्रमाचा शेवटचा भाग शूट होतोय. म्हणजे अवघ्या एक-दीड महिन्यात फू बाई फू प्रेक्षकांचा निरोप घेताना दिसत आहे. फू बाई फू च्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडतेय. त्यात अनेक मातब्बर कलाकार आपले जुने काही शो सोडून फू बाई फू मध्ये आले होते ज्याची वादग्रस्त चर्चा रंगली होती. सध्या तरी म्हणावा तसा टीआरपी कार्यक्रमाला मिळत नाही म्हणून कार्यक्रम गुंडाळला गेला असावा असंच कारण समोर येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT