Sunny Deol's Juhu residence up for auction by Bank of Baroda Esakal
मनोरंजन

Sunny Deol: सनीच्या बंगल्यावर जप्ती तलवार, बँकेनं पाठवली नोटीस! तारा सिंगला मोठा दणका

Vaishali Patil

Sunny Deol's Juhu residence up for auction by Bank of Baroda: बॉलिवूड अभिनेता सनी देओल हा त्याच्या 'गदर 2' चित्रपटामुळे चर्चेत आहे. मात्र आता सनीबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. लोकसभा खासदार असलेले अभिनेते सनी देओलला बँक ऑफ बडोदाने नोटीस बजावली पाठवण्यात आली आहे.

सनीने बँकेकडून मोठ्या रकमेचे कर्ज घेतल्याचा आरोप आहे. मीडियाने दिलेल्या माहितीनुसार 56 कोटींच्या थकबाकीबाबत बँक ऑफ बडोदाने त्याला ही नोटीस पाठवली आहे. इतकच नाही तर बँक ऑफ बडोदाने सनी देओलच्या व्हिलाच्या लिलावासाठी जाहिरात काढली आहे. या कर्जाच्या जामीनदारामध्ये सनी देओलचे वडील आणि अभिनेता धर्मेंद्र यांचं नाव लिहिण्यात आल्याचं वृत्तात म्हटलं आहे.

मिळालेल्या वृत्तानुसार सनी देओलने बँके कडून कर्ज घेतले मात्र त्याने त्याची परत फेड केलेली नाही. त्यामुळे त्याच्या मालमत्तेचा लिलाव होण्याची शक्तता आहे.

तर याबाबत बँकेकडून सांगण्यात आले की, सनीवर बँकेचे मोठे कर्ज आहे, ज्याच्या वसुलीसाठी बँकेने आता त्याच्या मुंबईतील मालमत्तेचा लिलाव करण्याची जाहिरात दिली आहे.

जाहिरातीत म्हटल्यानुसार, सनी देओलच्या 'सनी व्हिला' या बंगल्याचा लिलाव 25 सप्टेंबरला होणार आहे. त्याच्या बंगल्याच्या लिलावासाठी 51.43 कोटी रुपये किंमत राखीव ठेवली असल्याचा दावा मीडिया रिपोर्टमध्ये करण्यात येत आहे. मात्र याबाबत सनी देओलकडून काहीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

सनी देओलचा चित्रपट 'गदर 2' बॉक्स ऑफिसवर कमाल करत आहे. 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या गदर 2 या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईच्या बाबतीत अनेक रेकॉर्ड मोडले आहेत.

'गदर 2'च्या कमाईचे आकडे पाहता हा सिनेमा बॉलिवूडमधील 'पठाण'लाही टक्कर देईल अशी चर्चा आहे. या चित्रपटाने आता पर्यंत एकूण 335 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.

त्यामुळेच एवढ्या मोठ्या आणि लोकप्रिय अभिनेत्यावर करोडोंची थकबाकी असल्याचा आरोप झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. आता या प्रकरणी सनी काय पाऊल उचलणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Adityanath Mobile Number: अधिकारी काम करत नाहीत? CM योगींकडे करा थेट तक्रार! मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा मोबाईल नंबर

Harbhajan Singh : रोहित शर्माला ODI कर्णधारपदावरून हटवल्याने हरभजन सिंग खवळला, शुभमन गिलबाबत म्हणाला...

Marathi Movie : तरूणाईला प्रेमाचा जादुई अनुभव देणारं ‘ये ना पुन्हा’ गाणं प्रदर्शित!

Ajit Agarkar: रोहित शर्मासाठी परतीचा प्रवास सुरू? कर्णधारपदावरून दूर करण्याची माहिती दिली होती,आगरकर

Kolhapur Bhishi Scam : विश्वासू मित्र म्हणून भिशी भरायला दिली, अन् ४० महिलांना पती, पत्नीने २५ लाखांना गंडवलं...; कोल्हापुरातील घटना

SCROLL FOR NEXT