Gadar 2 Box Office Collection Day 3 Esakal
मनोरंजन

Gadar 2 box office collection Day 3: मैं निकला गड्डी लेके! गदरच्या कमाईच्या गाडीला ब्रेकच नाय!

Vaishali Patil

Gadar 2 Box Office Collection Day 3: बॉलिवूडमध्ये सध्या दोन सिनेमे बॉक्स ऑफिसवर धडकले आहे. चित्रपटांच्या क्लॅशचा परिणाम दोघांच्या कमाईवर झाला आहे. हे दोन सिनेमे म्हणजेच 'गदर 2' आणि 'OMG 2'. या दोन्ही सिनेमांनी आपली जादू दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

दोन्ही सिनेमांची स्टोरी ही पुर्णपणे वेगळी आहे. गदर2 मध्ये प्रेमकहानी बघायला मिळते तर दुसरीकडे 'OMG 2' लैंगिक शिक्षणा सारख्या गंभीर मुद्यावर भाष्य करत आहे. मात्र या युद्धात सनी देओलच्या 'गदर 2' ने अक्षयच्या 'OMG 2' ला मागे टाकत नवा विक्रिम केला आहे.

सनी देओल आणि आमिषा या जोडीला 22 वर्षांपूर्वी 'गदर2' मधून प्रेक्षकांचे जे प्रेम आणि उत्साह मिळाले होते तसेच प्रेम आणि प्रतिसाद आताही गदर 2ला मिळत आहे. पहिल्याच दिवशी 45 कोटींची कमाई करणाऱ्या या चित्रपटाने तीन दिवसांत बॉक्स ऑफिसवर शतक पुर्ण केले आहे.

40.10 कोटींच्या ग्रॅंड कलेक्शनसह ओपनिंग झालेल्या 'गदर 2'चा ओपनिंग वीकेंडही जबरदस्त ठरला आहे. या चित्रपटाने 2023 च्या मेगा ब्लॉकबस्टर चित्रपट 'पठाण' आणि 'बाहुबली'चा विक्रमही मोडला तर चित्रपटाने दुसऱ्या दिवसाशी 43.08 कोटी रुपयांचे कलेक्शन केले होते.

आता रिपोर्टनुसार, 'गदर 2' ने तिसऱ्या दिवशी 51.50 कोटींच्या जवळपास कमाई केली आहे. याचबरोबर या तीन दिवसात 'गदर 2' एकूण कलेक्शन आत 134 कोटी झाले आहे.

भारतात जवळपास 135 कोटींची कमाई करणाऱ्या सनी देओलच्या 'गदर 2' ने जगभरात एकूण 108.2 कोटीचा गल्ला जमवला. तिसऱ्या दिवशी 'पठाण' आणि 'बाहुबली' सारख्या मेगा ब्लॉकबस्टर सिनेमांचा रेकॉर्ड आता 'गदर 2' मोडला.

अनिल शर्मा दिग्दर्शित गदर 2 मध्ये सनी देओल आणि अमिषा पटेल यांनी तारा सिंग आणि सकीनाची भुमिका साकारली तर उत्कर्ष शर्मा आणि सिमरत कौर यांच्याही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : बळकावलेल्या जमिनींपासून बंदूकीच्या गोळ्यांपर्यंत! पुणे पोलिसांनी निलेश घायवळभोवती आवळला फास, घरावर छापेमारी, हाती लागलं मोठं घबाड

योजनांना पात्र, तरीही कर्ज मिळेना; उपचाराअभावी मुलगा गमावला, चित्रकार मंत्रालयासमोर करणार 'अर्ध नग्न लक्षवेधी चित्र' आंदोलन

Latest Marathi News Live Update : पूर्व विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज; उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता

Coldrif Syrup : मध्य प्रदेश-राजस्थानमध्ये मृत्यूंनंतर 'कोल्ड्रिफ सिरप'वर महाराष्ट्रात बंदी

Raju Shetti:'अन्यथा मुख्यमंत्र्यांना दिवाळी करू देणार नाही': माजी खासदार राजू शेट्टी; शेतकऱ्यांवर गंभीर संकट, मुख्यमंत्र्यांकडून दिशाभूल

SCROLL FOR NEXT