Gadar 2 Box Office Collection Day 6:  Esakal
मनोरंजन

Gadar 2 Box Office Collection Day 6: 65 वर्षाचा सनी सगळ्यांवर पडला भारी! गदर2 च्या कमाईला ब्रेक नाहीच...

Vaishali Patil

Gadar 2 Box Office Collection Day 6: बऱ्याच वर्षांनी सनी देओल आणि अमिषा पटेल यांनी चित्रपट 'गदर 2' मधुन पुन्हा बॉलिवूडमध्ये एंट्री मारली. प्रेक्षकांना या चित्रपटाची प्रतिक्षा होती. आता या चित्रपटाला रिलिज होऊन सहा दिवस झाले आहे. 'गदर 2' रोजच काही ना काही नवीन रेकॉर्ड तयार करत आहे. या चित्रपटाने बुधवारी सहाव्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.

बॉक्स ऑफिसवर आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडत गदर2 ने आता केवळ पठाण आणि सुलतानच नव्हे तर टॉलिवूडचा सुपरहिट सिनेमा 'बाहुबली: द कन्क्लूजन'लाही मागे टाकले आहेत. आता 'गदर 2' ने रिलीजच्या सहाव्या दिवशी किती कोटींची कमाई केली हे देखील जाणुन घेवुया.

गदर 2 7 दिवसात 300 कोटींच्या पुढे कमाई करणार असं काहीस चित्र बॉक्स ऑफिसवर दिसत आहे. 6व्या दिवशी बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायचं झालं तर सनी देओलच्या चित्रपटाने सहाव्या दिवशी 32.37 कोटींची बंपर कमाई केली. या आकडेवारीसोबतच गदर 2 ने भारतात एकूण 261.35 कोटींचा गल्ला जमवला आहे. तर जगभरात 338 च्या जवळपास कमाई केली आहे.

2023 चा सर्वात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये आता गदर2 चाही सामावेश आहे.गदर 2 ने पहिल्या दिवशी 40.1 , दुसऱ्या दिवशी 43.8, तिसर्‍या दिवशी बॉक्स ऑफिसवर 51.7 कोटींची कमाई केली. तर चौथ्या दिवशी या चित्रपटाने 39 कोटींची कमाई होती आता तर या सिनेमा लवकरच 500 कोटींचा आकडा पुर्ण करेल अशी अपेक्षा निर्मात्यांना आणि चाहत्यांना देखील आहे.

गदर 2 हा अनिल शर्मा दिग्दर्शित चित्रपट असून त्यात सनी देओल, अमिषा पटेल, उत्कर्ष शर्मा आणि मनीष वाधवा आणि इतर अनेक कलाकार आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : पुरुष 'लाडकी बहीण' कसे बनले? २६ लाख अपात्र असलेल्यांचे अर्ज मंजूर कसे झाले? वाचा नेमका कुठं घोळ झाला

Pension Dispute Assault : पेन्शनचे पैसे न दिल्याने पोरानं काठीने आईला केली मारहाण, पत्नी आडवण्यास गेली अन्

लफडं नवऱ्याला कळताच त्याचा हात तोडला अन् 10 वर्ष लहान भाच्यासोबत पळून गेली मामी, सोबत 13 वर्षाच्या मुलालाही नेलं

Nashik News : इंदिरानगरमधील वाढत्या छेडछाडीमुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण; पोलिसांचे तातडीने गस्त वाढवण्याचे आश्वासन

Mumbai News: कूपर रुग्णालयात घाणीचे साम्राज्य, रुग्णालय परिसरात अस्वच्छता

SCROLL FOR NEXT