Gadar 2 OTT Streaming Where, When To Watch Sunny Deol, Ameesha Patel blockbuster Film  esakal
मनोरंजन

Gadar 2 On OTT: गदर 2 OTT वर रिलीज! केव्हा आणि कुठे, पाहता येणार? जाणून घ्या एका क्लिकवर

Vaishali Patil

Gadar 2 OTT Streaming: अनिल शर्मा दिग्दर्शित सनी देओल आणि अमिषा पटेल यांचा गदर2 चित्रपट अजूनही थिएटरमध्ये आपली जादू दाखवत आहे. 'गदर-2' हा सनी देओलच्या कारकिर्दीतील आतापर्यंतचा सर्वात मोठा सुपरहिट चित्रपट आहे. या सिनेमात तब्बल 22 वर्षांनंतर 'तारा सिंह' आणि 'सकीना' यांची जोडी पुन्हा पेक्षकांना दिसली.

2001 मध्ये आमिर खानच्या 'लगान'शी टक्कर झालेल्या 'गदर: एक प्रेम कथा' पेक्षा 'गदर 2' ने बॉक्स ऑफिसवर जास्त कमाई केली. या चित्रपटाने केजीएफ-बाहुबली तसेच टायगर जिंदा है यासह देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर अनेक मोठ्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहे.

आता त्यातच या चित्रपटाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. हा सिनेमा आता OTT प्लॅटफॉर्म वर रिलिज होण्यासाठी सज्ज झाला आहे.

आता गदर 2 हा सिनेमा OTT प्लॅटफॉर्म Zee5 वर रिलीज होणार आहे. सनी देओलचा अ‍ॅक्शन चित्रपट 6 ऑक्टोबरला ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

'गदर 2: द कथा कंटिन्यूज' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश मिळवले आहे. आता हा चित्रपट लवकरच OTT प्लॅटफॉर्म Zee5 वर दिसणार आहे. मूव्ही स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मने याबाबत अधिकृत घोषणा केली आहे आणि त्याची ओटीटी रिलीज डेटही जाहीर केली आहे.

Zee5 ने गदर 2 च्या पोस्टला कॅप्शन दिले, “काउंटडाउन सुरू! तारा सिंग तुमचे मन जिंकण्यासाठी सज्ज आहे! भारतातील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर ZEE5 फक्त 2 दिवसात येत आहे! गदर 2 आता ZEE5 वर”

1947 च्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर आधारित ''गदर: एक प्रेम कथा' या चित्रपटाचा गदर 2' हा सिक्वेल आहे. या चित्रपटाने आत्तापर्यंत 526 कोटींच्या जवळपास कमाई केली आहे. चित्रपट अजूनही कमाई करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

IND vs ENG 2nd Test: Ohhh NO! शुभमन गिलच्या डोक्यावर चेंडू जोरात आदळला, डॉक्टरांची मैदानावर धाव अन्...

VIRAL VIDEO: यांना 'महाराष्ट्र केसरी' म्हणावं की दुसरं काही! दोन घोरपडीमध्ये रंगली दंगल, व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल

Alternative Careers: 9 ते 5 च्या ठराविक नोकरीला कंटाळला आहात? मग 'हे' 8 करिअर पर्याय तुमच्यासाठी ठरू शकतात योग्य पर्याय!

Viral: पैसे उधार घेणाऱ्यांनो लक्ष द्या...! उसने घेतलेली रक्कम वेळेत परत केली नाही तर होणार जेल अन्..., न्यायालयाचा निर्णय

SCROLL FOR NEXT