Gajedra Chauhan  Team esakal
मनोरंजन

कोरोनाकाळात युपी सुरक्षित, कारण 'योगी है तो यकीन है, ते हिंदू धर्माचे रक्षक'

देशात कोरोनाग्रस्तांची सर्वाधिक बिकट अवस्था युपीमध्ये असल्याची चर्चा आहे.

युगंधर ताजणे

मुंबई - कोरोनाच्या कहर वाढतो आहे. देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये कोरोनाची स्थिती गंभीर आहे. त्याला रोखण्यासाठी प्रशासकीय पातळीवरुन लढा देण्यात येत आहे. अनेक राज्यांमध्ये कोरोनाग्रस्तांची वाढणारी संख्या लक्षात घेऊन लॉकडाऊन करण्यात आले आहे. युपीमध्येही (Uttarpradesh) मात्र सध्या तो आटोक्यात आला आहे, त्याचे कारण म्हणजे तिथे योगी आदित्यनाथ आहेत. असे विधान करणारे अभिनेते गजेंद्र चौहान (Gajendra Chauhan ) भोव-यात सापडले आहे. gajendra chauhan coronas conditions better in up yogiji the defender of hindu

चौहान (Gajendra Chauhan ) यांनी एकापाठोपाठ व्टिट करुन योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांचे समर्थन केले आहे. ते हिंदू धर्माचे रक्षक आहेत. त्यामुळे त्यांनी युपीमधील परिस्थिती नियंत्रणात आहे अशा आशयाचे विधान चौहान यांनी केल्यानं ते ट्रोल होत आहेत. देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता अधिक असल्याचे वक्तव्य काही दिवसांपूर्वी शास्त्रज्ञांनी केले होते. त्यामुळे कोरोनाग्रस्तांची काळजी घेण्याचे आवाहन वेगवेगळ्या राज्यातील प्रशासकीय यंत्रणांवर आहे. मात्र कोरोनाबाधितांचा आकडा काही कमी होत नसल्याचे दिसून आले आहे. त्याचा फटका सर्वसामान्य लोकांना बसत आहे.

gajendra post

देशात कोरोनाग्रस्तांची सर्वाधिक बिकट अवस्था युपीमध्ये असल्याची चर्चा आहे. त्या राज्यांमध्ये ऑक्सिजन आणि औषधे यांचा तुटवडा असल्याची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. त्यावरुन सरकारला धारेवर धरले जात आहे. त्यांना प्रश्नही विचारले जात आहेत. यासगळ्या पार्श्वभूमीवर गजेंद्र चौहान यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची बाजू घेतली आहे. त्यांना पाठींबा देण्यासाठी चौहान यांनी अनेक व्टिट केले आहेत.

चौहान यांनी लिहिले आहे की, योगीजी केवळ मुख्यमंत्रीच नाही तर हिंदू धर्माचे रक्षकही आहेत. सगळा देश त्यांना पसंत करतो. अशाप्रकारचे व्टिट केल्यानंतर चौहान ट्रोल झाले आहेत. देशात कुठले राज्य कोरोनाच्या बाबत सर्वाधिक सुरक्षित आहे असा प्रश्न जर विचारला गेला तर मला युपीचे नाव सांगावे लागेल. याचे कारण मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आहेत. या शब्दांत त्यांनी योगींचे कौतूक केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs MI Live: ना तुला, ना मला... दीपक चहर अन् रॉबिन मिंझ यांची 'पाकड्यां'सारखी फिल्डींग; हार्दिक पांड्यावर तोंड लपवण्याची वेळ Video

KKR vs MI Live: दीपक चहरने कोलकाताच्या फॅन्सना डिवचले; Finn Allen ची विकेट, सूर्याला थांब म्हणाला अन् पुढे काय केले ते पाहाच Video

Tamil Nadu Politics: तमिळनाडू सरकार अडचणीत? राष्ट्रपती राजवटीची मागणी; सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, प्रकरण काय?

Konkan Tourism : तारकर्लीत ‘आयएनएस गुलदार’चे पाण्याखालील संग्रहालय; नियंत्रित जलसमाधीमुळे कोकण पर्यटनाला नवी ओळख

NEET Paper Leak : नीट पेपरफुटी प्रकरणानंतर पुण्यातील आरसीसी मोटेगावकर क्लासला महापालिकेची टाळेबंदी

SCROLL FOR NEXT