Game of Thorne spinoff serise jon snow  esakal
मनोरंजन

Game Of Throne: गेम ऑफ थ्रोन्सचा जॉन स्नो परत येतोय!, नव्या सीझनची घोषणा

जगभरातील ओटीटी माध्यमाचा जो प्रेक्षकवर्ग आहे त्याला एका मालिकेचं नाव हे माहिती असतचं. ती मालिका म्हणजे गेम ऑफ थ्रोन्स.

सकाळ डिजिटल टीम

OTT News: जगभरातील ओटीटी माध्यमाचा जो प्रेक्षकवर्ग आहे त्याला एका मालिकेचं नाव हे माहिती असतचं. ती मालिका म्हणजे गेम ऑफ थ्रोन्स. या मालिकेनं प्रेक्षकांना वेड लावलं होतं. तीन वर्षांहून अधिक (Game Of Thornes) काळ चाललेल्या या मालिकेचा शेवटचा भाग काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला. लाखो प्रेक्षकांना हीच उत्सुकता होती की, जॉन स्नो हाच आठ राजधान्यांचा राजा होणार की आणखी कुणी, त्यात ते (Entertainment News) उत्तर प्रेक्षकांना मिळालं. पण सरतेशेवटी गेम ऑफ थ्रोन्स त्याच ठिकाणी संपली असे अनेकांना वाटले. मात्र तिथुन पुढे प्रवास सुरु झाल्याची चर्चा आहे. याचे कारण जॉन स्नो अर्थात किट हँरिग्टननं एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केली आहे.

एचबीओ या चॅनेलवर गेम ऑफ थ्रोन्स ही मालिका नित्यनेमानं प्रदर्शित होत होती. जगभरातल्या दहा पेक्षा अधिक भाषांमध्ये डबिंग करण्यात आलेली ही मालिका आहे. या मालिकेची लोकप्रियता खूप मोठी आहे. ऑनलाईन मालिका, चित्रपट यांच्यासाठी ज्या खास पुरस्कारांचे आयोजन केले जाते त्यातील बहुतांशी पुरस्कार या मालिकेनं आपल्या नावावर केल्याचे दिसून आले आहे. त्यावरुन त्याची लोकप्रियता लक्षात येईलच. सध्या एचबीओ एका वेगळ्या प्रोजेक्टवर काम करत असून त्याविषयी सोशल मीडियावर पोस्ट शेयर केली आहे.

एचबीओनं आता गेम ऑफ थ्रोन्सच्या स्पिन ऑफ या मालिकेवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आहे. त्याच्यात प्रमुख भूमिका सगळ्यांचा आवडता जॉन स्नो करणार आहे. किट हँरिंग्टन या पुन्हा एकदा त्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. द हॉलीवूडच्या रिपोर्टरनं ही माहिती दिली आहे. गेम ऑफ थ्रोन्सच्या सीझनमध्ये जॉन स्नोला त्याची खरी ओळख कळते. त्यानंतर तोच आर्यन थ्रोनचा उत्तराधिकारी दाखवण्यात आला आहे. त्याच्यानंतरचा संघर्ष हा आता थ्रोन्सच्या स्पिन ऑफ हाऊसमध्ये दिसणार आहे.

जॉन स्नोच्या सिक्वेलशिवाय एचबीओ थ्रोन्सच्या मालिकेत स्पिन हाऊस ऑफ द ड्रॅगन ज्याचे मुळ ‘टेल्स ऑफ डंक अँड एग’ याच्यावर आधारित आहे. याचाही आनंद प्रेक्षकांना घेता येणार आहे. यापैकी हाऊस ऑफ द ड्रॅगनचा प्रिमीअर हा 21 ऑगस्ट रोजी पार पडणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raigad Fort Illegal Hotels : रायगडावर विनापरवानगी हॉटेल, रेस्टॉरंट, कॅफे; रोप -वे कंपनीचे अतिक्रमण, संभाजीराजेंचा घणाघात, "पुरातत्व विभागाकडून पाठबळ"

बिबट्यांना 'जन्मठेप', बालकांचा बळी घेणाऱ्या ४ बिबट्यांबाबत वनविभागाचा मोठा निर्णय

Maharashtra Assembly Winter Session : विधानसभेचे हिवाळी अधिवेशन आजपासून, उपराजधानीत घातपाताची शक्यता; पोलिस यंत्रणा हाय अलर्टवर

Indigo Plane : ‘इंडिगो’चे विमान ‘पार्किंग बे’वरच! रविवारी ५० विमाने रद्द

आजचे राशिभविष्य - 08 डिसेंबर 2025

SCROLL FOR NEXT