Ganesh Chaturthi 2023
Ganesh Chaturthi 2023 Esakal
मनोरंजन

Ganesh Chaturthi 2023: 'आई कुठे काय करते'च्या सेटवर गणरायाचं आगमन! 'चांद्रयान 3' चा देखावा करत कलाकारांनी दिली मानवंदना

Vaishali Patil

Ganesh Chaturthi 2023: आज सर्वत्र गणेशोत्सव मोठया जल्लोषात साजरा केला जात आहे. सगळीकडे भक्तीमय आणि उत्साहाचं वातावरण पहायला मिळत आहे. सर्वसामान्यांपासून ते कलाकारांपर्यंत सर्वजण आज बाप्पाचं स्वागत करत आहेत. कलाकारांनीही त्याच्या घरी बसविण्यात आलेल्या बाप्पाचे फोटो सोशल मीडियावर शेयर केले आहेत. त्यातच आता अभिनेते मिलिंद गवळी यांनी देखील गणरायाचा एक खास व्हिडिओ शेयर केला आहे.

आई कुठे काय करते या मालिकेत अनिरुद्धची भुमिका साकारुन घरोघरी प्रसिद्ध झालेले मिलिंद गवळी यांनी या मालिकेच्या सेटवरच्या गणरायाचा व्हिडिओ शेयर केला आहे. आई कुठे काय करते या मालिकेच्या सेटवर "चांद्रयान 3" चा देखावा करण्यात आला आहे. यात LVM3 चे रॉकेट ही दिसत आहे. खुप उत्तम देखावा मालिकेच्या सेटवर करण्यात आला आहे.

या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलयं की, "गणपती बाप्पा मोरया"

आमच्या "आई कुठे काय करते" या स्टार प्रवाह वरच्या मालिकेच्या सेटवरचा

गणपती बाप्पाचं आज गणेश चतुर्थीच्या दिवशी आगमन झालं आहे

आमच्या मालिकेचे सर्वेसर्वा राजन जी शाही , यांच्या हस्ते पूजा करून गणपती बाप्पाची स्थापना केली,

आमच्या मालिकेच्या बरेच कलाकार आणि तंत्रज्ञांच्या घरी गणपती बाप्पाचा आगमन होतं असंत त्यामुळे आम्हाला जरा extra सुट्ट्या हव्या होत्या, पण त्यामुळे सगळ्या ना जरा एक्स्ट्रा तास कामही करावं, पण पण आमच्या आर्ट डिपार्टमेंटनी त्याहून एक्स्ट्रा काम केलं आणि हा सुंदरसा गणपतीचा देखावा तयार केला, चंद्रयान तीन चं backdrop फारच गोड तयार केलं,

हा आमचा डी के पी कंपनीचा गणपती बाप्पा, जो आम्ही ठाण्यामध्ये बसवतो, त्याच्या व्यतिरिक्त डी के पी चे अजून तीन गणपती बाप्पा प्रत्येक त्यांच्या मालिकेच्या सेटवर बसतात,

"अनुपमाच्या" सेटवर " ये रिश्ता क्या कहलाता है " त्या सेटवर आणि BKAS त्या सेट गणपती बसतात,

ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेत तर गेली पंधरा वर्षे गणपती बाप्पाचं आगमन होत आहे, आणि आई कुठे काय करते या मालिकेचा आता चौथं वर्ष आहे,

आणि माझं भाग्य की चारी वर्ष मला गणेश चतुर्थीच्या गणपती बाप्पाच्या पूजेचा लाभ मिळाला.

आमचे दाजी खूप श्रद्धेने आणि प्रेमाने पूजाअर्चा ,होम हवन करत असतात.

आणि त्यामुळे एक वेगळंच चैतन्य आमच्या सेटवर निर्माण होतं,

कुठल्याही यशाच्या मागे एक दिव्यशक्ती असते याची प्रचिती नेहमी होते,

तुम्हा सर्वांना गणपती बाप्पाचा आशीर्वाद मिळो आणि तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होवो हीच बाप्पाकडे सदिच्छा,

"वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्वीघ्नम कुरुमे देव सर्वकार्येषु सर्वदा"

मिलिंद गवळी यांनी शेअर केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. तर अनेकांनी देखाव्याचं कौतुक केलयं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT