Ganpath Release Date Esakal
मनोरंजन

Ganpath Release Date: 'ऐ गणपत येतोय रे!' टायगरने धमाकेदार व्हिडिओ शेअर करत सांगितली रिलीज डेट

सकाळ डिजिटल टीम

Ganpath Release Date: बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफ हा त्याच्या अभिनयाबरोबरच फिटनेस साठी ओळखला जातो. त्याची डॅशिंग बॉडि तरुणींना भुरळ घालते तर मुलांना त्याचा हेवा वाटतो. टायगर सध्या त्याच्या गणपत चित्रपटामुळं चर्चेत आहे. आता नुकतच त्यांने या सिनेम्याची झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. त्याचबरोबर त्याने गणपत ची रिलिज डेटही सांगितली आहे.

सोशल मीडियावर एक धमाकेदार व्हिडिओ शेअर करताना त्याने चाहत्यांना हा चित्रपट कधी बघायला मिळणार असल्याचे सांगितले आहे. गणपतमध्ये टायगर श्रॉफ अॅक्शन मोडमध्ये दिसणार आहे. टायगरने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला लोकांचा जमाव ओरडताना दिसत आहे.

व्हिडिओमध्ये पुढे टायगर श्रॉफची एन्ट्री आहे. तो त्याच्या मस्त स्टाईलमध्ये दिसत आहे. त्याच वेळी, त्याने डायलॉग मारला आहे. तो म्हणतो, “मला ना लढाई आवडते ना लढणारे. आता विचार करतोय दोघांपैकी कुणाला संपवू' या व्हिडीओमध्ये टायगरची झलक ज्या प्रकारे पाहायला मिळत आहे, त्यावरून चित्रपटात धमाकेदार अॅक्शन दिसणार हे मात्र नक्कीच.

हा व्हिडिओ शेअर करताना टायगर श्रॉफने कॅप्शनमध्ये लिहिले की, "ज्या जगात दहशतवादाचं राज्य आहे, तिथं गणपत आपल्या लोकांचा आवाज बनून येत आहे." चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेबद्दल बोलायचे झाल्यास, हा चित्रपट यावर्षी 20 ऑक्टोबर रोजी दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.

हा गणपत चित्रपटाचा हा पहिला भाग असेल. गणपत १ ऑक्टोबरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर त्याचा दुसरा भागही येत्या काळात पाहायला मिळणार आहे. टायगरशिवाय या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि क्रिती सेनॉन देखील आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT