Gautami Patil  esakal
मनोरंजन

Gautami Patil: 'सगळ्या तारखा गेल्या, हा महिना पूर्ण बूक' गौतमीनं सांगून टाकलं

सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून गौतमी पाटील ही चांगलीच व्हायरल झाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Guatami Patil: सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून गौतमी पाटील ही चांगलीच व्हायरल झाली आहे. सांगली जिल्ह्यातील बेडग गावामध्ये झालेल्या तिच्या लावणीच्या कार्यक्रमाला प्रेक्षकांची गर्दी लोटली होती. या गर्दीमुळे जवळच असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेची मोठ्या प्रमाणात नुकसानही झाले होते. त्यामुळे चर्चेत आलेल्या गौतमीची पुण्यात पत्रकार परिषद झाली. त्यात तिनं केलेल्या खुलाशानं पुन्हा एकदा नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.

गौतमी म्हणाली, माझ्या त्या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी खूप गर्दी केली होती. मला त्याची कल्पना आहे. एवढी गर्दी होईल असे वाटले नव्हते. यावेळी गौतमीनं आपल्याबद्दल सोशल मीडियावर वेगवेगळ्या अफवा पसरवल्या जात असल्याचे म्हटले आहे. मी कोल्हापूर ची नाही मी धुळ्याची आहे लोकं माझ्या बाबत काहीही बोलत असतात. शिंदखेडा हे माझं मूळ गाव. जन्मापासून माझ्या वडिलांना मला आणि आईला सोडलं माझे वडील माझ्या आईला मारहाण करायचे. आईंनं खूप कष्ट करुन आम्हाला घडवलं.

आईचा अपघात झाला आणि मग मोठं संकट उभं राहिलं. तेव्हापासून मग मी डान्स करायला लागले. घर सांभाळण्यासाठी ऑर्केस्ट्रामध्ये काम करु लागले. घरची परिस्थिती चांगली नव्हती म्हणून मी आधी बॅक स्टेज डान्सर म्हणून काम केले आणि त्यानंतर मी लावणी सुरु केली. यावेळी गौतमीनं माफी मागितली आहे. ती म्हणाली, माझ्या कडून जी चूक झाली ती मी मान्य करते. डान्स करण्याच्या फ्लो मध्ये झाले पण आज पुन्हा त्यासाठी मी सगळ्यांची माफी मागते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Scorpio कारमध्ये माजी सरपंचासह 4 जणांना जिवंत जाळलं; दुमडलेली सीट, रक्तानं माखलेली आगपेटी अन् विटांवर रक्ताचे डाग.., घातपाताचा संशय बळावला!

Pune News : पुणे शहरात सिमेंट काँक्रिट उखडले; रस्त्यावर पुन्हा खड्डे

Pali Census : 40 ते 42 अंश सेल्सिअस तापमानात 'सुपरहिरो' बनून फिरतायत शिक्षक; उन्हाच्या लाहीलाहीतही जनगणनेचे राष्ट्रीय कर्तव्य अविरत सुरू

Nashik POCSO Case : नाशिकमध्ये गुरु-शिष्याच्या नात्याला काळिमा; 15 वर्षांच्या विद्यार्थिनीचे फोटो काढून शिक्षकाने केले ब्लॅकमेल, मनसूरचे धक्कादायक कृत्य

Amit Shah: ''शक्य तेवढ्या लवकर आपल्या देशात निघून जा'', अमित शाहांचा इशारा; 'ती' जमीन बीएसएफकडे सुपूर्द

SCROLL FOR NEXT